Makar Sankranti : हळदी कुंकवाला येणाऱ्या महिलांना काय वाण द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा 6 युनिक पर्याय
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
नवीन वर्ष सुरु झाल्यावर येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सर्वजण एकमेकांना तिळगुळ वाटप करून तोंड गोड करतात. या सणाच्या निमित्ताने महिला घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवतात. घरी आलेल्या महिलांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. यंदा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना काय वाण द्यायचे असा प्रश्न त्याचे आयोजन करण्याऱ्या महिलांना पडतो. तेव्हा वाणासाठी काही खास बजेट फ्रेंडली वस्तूंचे पर्याय तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
1/6

किचन ऍप्रन : हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वाण देण्यासाठी किचन ऍप्रन हा एक उत्तम पर्याय आहे. महिला स्वयंपाक घरात काम करत असताना तिच्या कपड्याना डाग लागू नयेत म्हणून किचन ऍप्रनचा उपयोग करू शकतात. बाजारात हे किचन ऍप्रन प्रति नग 40 रुपयांपासून सुरु होतात.
advertisement
2/6
कापडी पिशव्या : अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आहे. तेव्हा हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वाण देण्यासाठी कापडी पिशव्या हा चांगला पर्याय आहे. महिला भाजीसाठी जाताना किंवा सामना खरेदी करताना कापडी पिशव्यांचा वापर करू शकतात. बाजारात विविध डिझाईनच्या कापडी पिशव्या उपलब्ध असून त्यांची किंमत अवघ्या 10 रुपयांपासून सुरु होते.
advertisement
3/6
ऑइल ब्रश : हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वाण देण्यासाठी ऑईल ब्रश हा देखील उत्तम पर्याय आहे. तव्यावर डोसा करताना चपाती भाजताना तेल लावण्यासाठी ऑइल ब्रशचा वापर केला जातो. हे ऑइल ब्रश बाजारात अवघ्या 20 रुपयांपासून मिळतात.
advertisement
4/6
लहान झाडाची रोप : महिलांना वाण म्हणून तुम्ही शोभेची लहान झाड देखील भेट देऊ शकता. ही झाड बाजारात 20 रुपयांपासून उपलब्ध असतात.
advertisement
5/6
नेलपेंट : महिलांना सौंदर्य प्रसाधनांची फार आवड असते. तेव्हा तुम्ही महिलांना सुंदर अशा रंगाच्या नेलपेंट भेट म्हणून देऊ शकता. नेलपेंट सोबत हवे असल्यास तुम्ही नेलपेंट रिमूव्हर देखील भेट म्हणून देऊ शकता. नेलपेंट बाजारात 30 रुपयांपासून उपलब्ध असते.
advertisement
6/6
ड्रायफ्रूट्स : बहुतेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमी असते. तेव्हा ही कमी भरून काढण्यासाठी खजूर सारखे ड्रायफ्रूट्स एक उत्तम पर्याय ठरतात. तेव्हा तुम्ही हळदी कुंकवाला वाण म्हणून महिलांना खजुराचे लहान पॅकेट्स भेट करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Makar Sankranti : हळदी कुंकवाला येणाऱ्या महिलांना काय वाण द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा 6 युनिक पर्याय