TRENDING:

भारीच! मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने तेही फक्त 80 रुपयांपासून; मुंबईतील या खास मार्केटमध्ये करा खरेदी

Last Updated:
मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने हे खास आकर्षण असते. मुंबईतील या मार्केटमध्ये तुम्हाला फक्त 80 रुपयांपासून दागिन्यांची खरेदी करता येईल.
advertisement
1/6
हलव्याचे दागिने तेही फक्त 80 रुपयांपासून; मुंबईतील या खास मार्केटमध्ये करा खरेदी
अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली आहे. मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने हे खास आकर्षण असते. त्यामुळे बाजारातही आता हलव्याचे दागिने घेण्यासाठी महिलांची लगबग सुरु झालेली पाहायला मिळतेय. असेच सुंदर, रेखीव आणि खिशाला परडवडणारे दागिने खरेदी करायचे असतील तर त्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे मुंबईतील दादर मार्केट. दादर मार्केटमध्ये अनेक दुकानांमध्ये हलव्याचे वेगवेगळे दागिने आपल्याला पाहायला मिळतात.
advertisement
2/6
दादर पश्चिम येथील छबीलदास रोडवरील मार्केटमध्ये साज नावाचं दुकान आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं या दुकानात खास हलव्याचे दागिने पाहायला मिळतात. बाजूबंदापासून ते अगदी छोट्याशा नथीपर्यंत आणि गळ्यातल्या मंगळसुत्रापासून ते कंबरपट्टयापर्यंत सगळ्या प्रकारची हलव्याचे दागिने या दुकानात आहेत.
advertisement
3/6
या हलव्याच्या दागिन्यांमध्ये हार, नेकलेस, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकुट असे अनेक प्रकारही पाहायला मिळतात. लहान मुलांसाठीही विशेष प्रकारचे हलव्याचे दागिने विक्रीसाठी मार्केटमध्ये आले आहेत.
advertisement
4/6
यामध्ये हलव्याच्या दागिन्यांमध्ये लहान मुलांसाठी श्रीकृष्ण सेट तर, मुलींसाठी राधासेट आहे. साजमधील हलव्याच्या दागिन्यांची आणखी एक खासियत म्हणजे ते खिशाला परवडणारे आहेत.
advertisement
5/6
सुट्या म्हणजे सिंगल दागिन्यांची किंमत सुरु होते फक्त 80 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत आणि दागिन्यांचा सेट घ्यायचा असल्यास त्यांची किंमत सुरु होते 200 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत. यामध्ये महिलांसाठी वेगळ्या पद्धतीच्या हलव्याच्या दागिन्यांचा सेट आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हलव्याचे दागिने घेण्यासाठी लोकांचा खास प्रतिसाद आहे, अशी माहिती दुकानाचे मालक धनेश पाटील यांनी दिली आहे.
advertisement
6/6
तुम्हालाही असे सुंदर हलव्याचे दागिने आणि तेही अगदी कमी किंमतीत खरेदी करायचे असतील तुम्ही नक्कीच दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी जाऊ शकता. तसही संक्रांती दिवशी हलव्याचे दागिने घालण्याची आपली जुनी प्रथा आहे. त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांच्या खरेदीनं तुमच्या मकर संक्रांतीचा गोडवा नक्कीच वाढेल यात दुमत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
भारीच! मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने तेही फक्त 80 रुपयांपासून; मुंबईतील या खास मार्केटमध्ये करा खरेदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल