Marathi Bhasha Din 2024 : 27 फेब्रुवारीचे काय आहे महत्त्व, याच दिवशी का साजरा करतात मराठी भाषा दिन?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मराठी ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. परंतु मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला का साजरा केला जातो? चला जाणून घेऊया.
advertisement
1/6

मराठी ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. यात एकूण 42 बोली आहेत. त्यापैकी वैदर्भी, झाडीबोली, कोकणी आणि खान्देशी या सर्वात सामान्य आहेत. मराठी भाषेतील वाक्यरचना आणि व्याकरण प्राकृत आणि पालीमधून आले आहे.
advertisement
2/6
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक लोक बहुसंख्य आहेत. मात्र तरीही मराठी ही भाषा राजभाषा होण्यास बराच वेळ लागला. अनेक साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी यासाठी लढा दिला आणि त्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेच्या माहितीबद्दल अनेक संत, साहित्यिकांनी खूप काही लिहून ठेवले आहे.
advertisement
3/6
मराठी भाषिक लोक अनेक देशांमध्ये असल्याने ही भाषा महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी बोलली जाते. यासोबतच मराठी साहित्याची मोठी व्याप्ती मोठी असल्याने त्याचे चाहतेही अनेक आहेत. मराठी भाषेमध्ये अनेक दिग्गज कवी, लेखकांनी अप्रतिम कलाकृतींची निर्मिती केली आहे.
advertisement
4/6
मराठी साहित्याची निर्मिती करणाऱ्या अशा सर्व दिग्गज व्यक्तींमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीही संघर्ष केला.
advertisement
5/6
अशा कुसुमाग्रजांची जयंती 27 फेब्रुवारी असल्यामुळे हा दिवस निवडला गेला. 1999 मध्ये कवीच्या निधनानंतर हा उत्सव सुरू झाला. अनेक गाजलेल्या साहित्यकृतीचे निर्माते कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके कवी, साहित्यिक, कादंबरीकार, थोर लेखक नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणून ओळखले जातात.
advertisement
6/6
कुसुमाग्रजांनी अनेक कादंबऱ्या, कविता, निबंध, लघुकथा, नाटक, यांचं प्रभावीपणे लेखन केलेल आहे. त्यांचे नटसम्राट हे नाटक आणि 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी विशाखा कवितासंग्रह या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. आजच्या या दिवशी <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/marathi-bhasha-gaurav-din-2024-wishes-in-marathi-importance-of-marathi-bhasha-din-mhpj-1134721.html">मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा</a> आपल्या मित्रपरिवाराल नक्की द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Marathi Bhasha Din 2024 : 27 फेब्रुवारीचे काय आहे महत्त्व, याच दिवशी का साजरा करतात मराठी भाषा दिन?