TRENDING:

Food Poisoning : पावसाळ्यात वाढलंय फूड पॉयझनिंगचं प्रमाण? अशी घ्या काळजी

Last Updated:
पावसाळ्यात फूड पॉयझनिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ होते. अन्नातील विषबाधेने दरवर्षी अनेकजणांचा जीव सुद्धा जातो. त्यामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देणे महत्वाचे असते. तेव्हा फूड पॉयझनिंग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि फूड पॉयझनिंगची लक्षण कोणती याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/6
पावसाळ्यात वाढलंय फूड पॉयझनिंगचं प्रमाण? अशी घ्या काळजी
अन्नातून विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग झाल्यावर त्याचा लगेचच परिणाम दिसून येत नाही. अन्न खाल्ल्यावर लगेचच विषबाधेची लक्षण दिसून येतात असे नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं आहे यावर ते अवलंबून असते. सर्व खाद्यपदार्थांममुळे विविध जीवाणू तयार होतात ज्याचा परिणाम 12 तासांपासून ते 70 दिवसांनंतर होऊ शकतो.
advertisement
2/6
डॉक्टरांच्या मते, फूड पॉयझनिंग झाल्यावर पोटात तीव्र वेदना, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, ताप अशी लक्षण जाणवू लागतात. फूड पॉयझनिंग लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आढळून येते.
advertisement
3/6
फूड पॉयझनिंग झाल्यावर शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. तेव्हा नारळ पाणी, ग्लुकोज, इलेक्ट्रोलाईट पावडर आणि लिंबू पाणी इत्यादींचे सेवन करावे. केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते तेव्हा फूड पॉयझनिंग झाल्यावर डायरियापासून आराम मिळतो.
advertisement
4/6
फूड पॉयझनिंग झाल्यावर पोटात तीव्र वेदना होऊ लागते. अशावेळी आल्याचा रस पाण्यात टाकून पिऊ शकता. तसेच अशावेळी मांसाहार करणे टाळावे.
advertisement
5/6
उन्हाळा आणि पावसाळ्यात फूड पॉइजनिंगचं प्रमाण वाढतं अशावेळी तुम्ही जेवताना जिरे भाजून ते दही किंवा ताकात मिसळून त्याचे सेवन करावे. तसेच या दिवसात शिळं अन्न खाऊ नये.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Food Poisoning : पावसाळ्यात वाढलंय फूड पॉयझनिंगचं प्रमाण? अशी घ्या काळजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल