TRENDING:

Must have Cloths : तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे 8 ड्रेसेस कायम असावे, 5 मिनिटांत मिळेल स्टायलिश लूक..

Last Updated:
Must have basics for every wardrobe : काही मुलींना तयार होण्यास बराच वेळ लागतो. त्यांची मुख्य समस्या म्हणजे त्यांना हवा असलेला लूक मिळत नाही. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी येथे काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.
advertisement
1/9
तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे 8 ड्रेसेस कायम असावे, 5 मिनिटांत मिळेल स्टायलिश लूक..
बहुतेक मुलींसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे ड्रेस निवडणे. तुमचा वॉर्डरोब अपडेट ठेवणे आणि कॉम्बिनेशन ड्रेसेसचा साठा केल्याने ही समस्या बरीच कमी होऊ शकते. मुलींच्या वॉर्डरोबमध्ये कोणते कपडे असावेत याबद्दल जाणून घ्या.
advertisement
2/9
कॉलरसह पांढरा शर्ट : प्रत्येक मुलीसाठी पांढरा शर्ट आवश्यक असतो. तुम्ही तो वेगवेगळ्या बॉटमसह पेअर करू शकता. जीन्स, पॅलाझो, पॅन्ट, लेगिंग्ज किंवा अगदी स्कर्टसह हा शर्ट पेअर करता येऊ शकतो. याने एक सुंदर लूक मिळेल. तुम्ही हा शर्ट कूल आणि फॉर्मल लूकसाठी घालू शकता.
advertisement
3/9
डेनिम जीन्स : डेनिम जीन्स एव्हरग्रीन असतात. विशेषतः जर तुमच्याकडे निळ्या जीन्स आणि काळ्या जीन्सची जोडी असेल तर तुमच्या जवळजवळ सर्व फॅशन समस्या सोडवल्या जाऊ शकतात. ही कधीही घातली जाऊ शक्ये. कॉलेज, ऑफिस, शॉपिंग, मित्रांसोबत फिरायला जाणे किंवा कोणत्याही प्रसंगी, कोणताही विचार न करता ही जीन्स घालता येते. फक्त चांगले कापड असलेली आणि चांगली फिटिंग असलेली जीन्स निवडणे आवश्यक आहे. प्रसंगानुसार तुम्ही ती टी-शर्ट, शर्ट किंवा कुर्तीसोबत पेअर करू शकता.
advertisement
4/9
काळी आणि पांढरि लेगिंग्ज : जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये काळी आणि पांढरी लेगिंग्ज असेल तर तुम्ही ती कोणत्याही कुर्तीसोबत घालू शकता. या लेगिन्स आरामदायी आणि देखभालीसाठी सोप्या आहेत. त्यांना इस्त्रीची आवश्यकता नसते.
advertisement
5/9
स्ट्रेट कट कुर्ती : तुम्ही डेनिम, चुडीदार लेगिंग्ज आणि पलाझो पँटसह सरळ कट कुर्ती घालू शकता. ही कुर्ती स्टायलिश दिसते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती दुपट्ट्यासोबत किंवा त्याशिवाय घालू शकता.
advertisement
6/9
मॅक्सी ड्रेस : सर्व शरीरयष्टीच्या मुलींसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मॅक्सी ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक स्टाइल स्टेटमेंट असतो. तो तुम्हाला कॅज्युअल आणि सेमी-फॉर्मल प्रसंगी परिपूर्ण लूक देईल.
advertisement
7/9
साडी : साडी कोणत्याही प्रसंगी पूरक ठरू शकते. हातमागाच्या साड्यांव्यतिरिक्त, तुमच्या वॉर्डरोबमध्ये एम्ब्रॉयडरी, शिफॉन आणि बनारसी साड्या ठेवा.
advertisement
8/9
डेनिम जॅकेट : प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये डेनिम जॅकेट असायला हवे. ते नियमित टी-शर्ट, प्लेन टॉप, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट ड्रेस आणि स्पेगेटी ड्रेससह घाला. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही परिपूर्ण आणि स्मार्ट लूकसाठी कोणत्याही पोशाखासह हे जॅकेट घालू शकता.
advertisement
9/9
श्रग : आजकाल श्रग खूप लोकप्रिय होत आहेत. जॅकेट स्टाईलपासून ते केप स्टाईलपर्यंत अनेक प्रकारचे श्रग आहेत, जे तुम्ही जीन्सपासून साड्या आणि सलवार सूटसोबतही पेअर करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Must have Cloths : तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे 8 ड्रेसेस कायम असावे, 5 मिनिटांत मिळेल स्टायलिश लूक..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल