TRENDING:

Weather Alert: पावसाचं धुमशान सुरूच! मराठवाड्याला पुन्हा अलर्ट; बीड, संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
पावसाचं धुमशान सुरूच! मराठवाड्याला पुन्हा अलर्ट; संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मराठवाड्यातील नांदेड, जालना आणि परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.
advertisement
2/5
आज देखील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरींसह वाऱ्याचा वेग प्रतितास 30 ते 40 किलोमीटरपर्यंत असू शकतो. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विशेषतः निचांगी भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका आहे. शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
advertisement
4/5
लातूर जिल्ह्यात पुढील 24 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचाही अंदाज आहे. दुसरीकडे, हिंगोली, जालना आणि परभणी या जिल्ह्यांना मात्र यलो अलर्टमधून वगळण्यात आले आहे. तरीसुद्धा, हवामान विभागाने या भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये आजचा दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. पुढील 2-3 दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. अचानक वाढणाऱ्या पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: पावसाचं धुमशान सुरूच! मराठवाड्याला पुन्हा अलर्ट; बीड, संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल