TRENDING:

IND vs NZ : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यातही सूर्याने 'जुगार' खेळला, टीम इंडियामधून तिघांना डच्चू

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या शेवटच्या आणि पाचवा टी-20 सामना तिरुवनंतपुरममध्ये होत आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधीचा भारताचा हा शेवटचा सामना आहे.
advertisement
1/6
वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यातही सूर्याने जुगार खेळला, टीममधून तिघांना डच्चू
न्यूझीलंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या 3 सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला.
advertisement
2/6
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. त्याआधी भारताचा हा शेवटचा टी-20 सामना आहे. संजू सॅमसनचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. संपूर्ण सीरिजमध्ये संजूला एकही मोठा स्कोअर करता आलेला नाही.
advertisement
3/6
या सामन्यातही संजू अपयशी ठरला तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजूला बेंचवरच बसावं लागू शकतं. त्याच्याऐवजी इशान किशन हा अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला बॅटिंग करेल.
advertisement
4/6
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. काल रात्री मैदानात मोठ्या प्रमाणावर धुकं पडलं होतं. धुक्यामुळे बॉल ओला होतो आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलरना बॉल पकडणंही मुश्कील होतं, त्यामुळे आम्हाला आमच्या बॉलिंगची परीक्षा पाहायची आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
5/6
पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियात 3 बदल करण्यात आले आहेत. अक्षर पटेल, इशान किशन आणि वरुण चक्रवर्ती यांचं टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर हर्षित राणा, कुलदीप यादव आणि रवी बिष्णोई यांना डच्चू देण्यात आला आहे.
advertisement
6/6
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यातही सूर्याने 'जुगार' खेळला, टीम इंडियामधून तिघांना डच्चू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल