Sunetra Pawar: अजितदादांच्या नावाच्या घोषणा, धीरगंभीर वातावरणात सुनेत्रा पवारांची शपथ, खास फोटो
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना ही शपथ दिली होती.
advertisement
1/6

अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना ही शपथ दिली होती.
advertisement
2/6
सुनेत्रा पवार यांनी ही शपथ घेतल्यामुळे त्या आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. कारण याआधी कोणत्याही महिला उप मुख्यमंत्री झाल्या नव्हत्या.
advertisement
3/6
धीरगंभीर वातावरणात हा शपथविधी पार पडला आहे.या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार आणि नेतेमंडळी उपस्थित होते.
advertisement
4/6
विशेष म्हणजे ज्यावेळेस सुनेत्रा पवार या शपथविधीला व्यासपीठावर होत्या.त्यावेळेस काही आमदारांनी 'अजितदादा अमर रहे','एकच वादा अजितदादा' अशा घोषणाही दिल्या होत्या.तसेच अत्यंत साधेपणात हा शपथविधी पार पडला होता.
advertisement
5/6
खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर उप मुख्यमंत्रीपदी कोण बसणार हा मोठा प्रश्न होता. पण आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली.
advertisement
6/6
या निवडीनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा उप राष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या उप मुख्यमंत्री पदाची शपथविधीचा मार्ग मोकळा झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: अजितदादांच्या नावाच्या घोषणा, धीरगंभीर वातावरणात सुनेत्रा पवारांची शपथ, खास फोटो