पाय तुटलेला, स्पायनल कॉर्ड बाहेर… मृत्यूच्या दारातून परतलेल्या मराठी अभिनेत्रीची अंगावर काटा आणणारी कहाणी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृत्यूच्या दारातून परत आली. अपघाताच्या जवळपास 5 वर्षांनी तिनं तिच्या अपघाताची अंगावर शहारे आणणारी स्टोरी सांगितलं.
advertisement
1/10

अनेक कलाकार आहेत ज्यांनी एका मोठ्या अपघातातून स्वत:ला बाहेर काढून त्यांच्या आयुष्याची एक नवी इनिंग सुरू केली. अशीच एक मराठी अभिनेत्री जिचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर सहा महिने ती बेड रिडन होती. आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच वर्षा दांदळे. वर्षा यांना पहिल्यांदाच त्यांच्या अपघाताविषयी सांगितलं.
advertisement
2/10
लोकमत सखीशी बोलताना वर्षा दांदळे म्हणाल्या, "कार अपघात होता तो. आम्ही चार जणं एका कार्यक्रमासाठी नाशिकला गेलेलो. येताना अपघात झाला. करोना काळ होता. भंडारधरावरून येताना तिथे एका वळणावर रेती टाकली होती. तिथून गाडी घसरली की त्या माणसांना लुटायचं. आमच्यासारखा असा सेम अपघात त्याच ठिकाणी झालेला."
advertisement
3/10
"अपघात झाल्याच्या एक महिना आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी बेडरिडन होते. कोरोना काळात गावागावत अशी माणसं लुटायची काम करत होते. आमचा एक मित्र बेशुद्ध पडला नाही. मित्राची बायको कण्हत होती. मी आणि माझा मित्र आम्ही बेशुद्ध होतो."
advertisement
4/10
वर्षा यांनी पुढे सांगितलं, "जो मित्र चांगला होता तो आम्हाला सांगत होता की, कुणीच रस्त्यावर थांबायला तयार नाही. तिथे नेटवर्क नाही. मग एक माणूस भेटला. तो त्याच्यापुढ्यात बसला म्हणाला, नाही जायचं. माझी लोक मरतायत. नंतर अँम्बुलन्स आली. अपघाताच्या दोन तासानंतर अँम्बुलन्स आली. तोपर्यंत आम्ही तिथे तिथेच होतो."
advertisement
5/10
"माझ्या मित्राच्या बायकोनं दरवाजा उघडला तेव्हा पाण्यामध्ये नाग होता. तिने दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी गॅरेजवाले गाडी आणायला गेले तेव्हा तो आत बसला होता. त्यादिवशी मरण होतं."
advertisement
6/10
वर्षा पुढे म्हणाल्या की, "माझी मुलगी नाशिकलाच राहते. ती फिजिओथेरपिस्ट आहे. तिने KEM मधून शिक्षण घेतलंय. हॉस्पिटलमध्ये सगळा सेटअप तयार केला. तिला फोन केला. तिने पाहिलं. कोणाला काय झालंय हे तिने सगळं ठरवलं. निर्णय घेतले आणि पुढच्या दीड तासात आमचं स्कॅनिंग झालं."
advertisement
7/10
अपघातात वर्षा यांना खूप मार लागला होता. त्याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, "माझा पाय तुटून पडलेला. आता पूर्ण प्लेट आहे. माझा स्पायनल कॉर्ड मणक्याच्या बाहेर पडलेला. माझ्या मित्राच्या चेहऱ्यात काचा घुसल्या होत्या. त्याची प्लास्टिक सर्जरी झाली. माझे दोन ऑपरेशन झाले. मित्राचेही आणि मैत्रिणीचे दोन ऑपरेशन झाले."
advertisement
8/10
"एकाच वेळी माझे दोन ऑपरेशन करायचे होते. कारण दोन वेळा एनिस्थेशिया मला झेपणार नव्हता. त्यानंतर मी तीन महिने एकाच जागेवर होते. पण मी सहा महिन्यात उभी राहिले."
advertisement
9/10
अभिनेत्री वर्षा यांना मान हलवता येत नव्हती. या काळात त्यांनी अनेक सिनेमा पाहिले. सहा महिन्यांनी त्यांना एक सिनेमा मिळाला. त्यानंतर बॉस माझी लाडाची या मालिकेत त्यांनी काम केलं.
advertisement
10/10
वर्षा दांदळे यांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्या, त्या गेली अनेक वर्षा मराठी मालिका, सिनेमा आणि नाटकात काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 'नांदा सौख्य भरे', 'अशोक मा.मा', 'पाहिले न मी तुला', 'नवा गडी नवं राज्य', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' सारख्या दमदार मालिकेत काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पाय तुटलेला, स्पायनल कॉर्ड बाहेर… मृत्यूच्या दारातून परतलेल्या मराठी अभिनेत्रीची अंगावर काटा आणणारी कहाणी