सुंदर दिसण्यासाठी, लोक अनेकदा महागडी सौंदर्यप्रसाधनं, क्रीम आणि विविध उपचार करतात, पण ही उत्पादनं त्वचेची वरवरची दुरुस्ती करतात. खरं सौंदर्य आतून येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य आहार आणि पोषण आवश्यक आहे. त्वचा निरोगी आणि चमकदार हवी असेल तर आहारात या फळांचा समावेश नक्की करा.
White Hair : तरुण वयातच केस पांढरे का होतात ? पाहूयात केस पांढरे होण्याची कारणं
advertisement
केळी - केळी हे सर्वात स्वस्त आणि पौष्टिक फळांपैकी एक. यात जीवनसत्त्वं अ, B6 आणि क भरपूर प्रमाणात असतात. दररोज केळी खाल्ल्यानं त्वचा मॉइश्चरायझ होते आणि कोरडेपणा कमी होतो. यामुळे त्वचा मऊ होते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. त्यातले अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
सफरचंद - त्वचा जास्त काळ तरुण ठेवण्यासाठी सफरचंद खाऊ शकता. सफरचंदांमधे फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे, मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी मदत होते.
पपई - पपई त्वचेसाठी वरदान आहे. त्यात पपेन नावाचं एंजाइम असतं, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी याची मदत होते आणि नवीन त्वचा तयार करण्यास मदत करते. पपई खाल्ल्यानं डाग, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी होऊ शकतं.
Heart Repair : आपलं हृदय करु शकतं स्वत:ची दुरुस्ती, विज्ञानातली आशादायक बातमी
संत्री - संत्री म्हणजे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. कोलेजन तयार करण्यासाठी याची मदत होऊ शकते. कोलेजन त्वचा मजबूत आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
पेरु - पेरु हे सर्वात स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. दररोज पेरु खाल्ल्यानं शरीर आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
