TRENDING:

Sanju Samson : घरच्या मैदानातच संपलं संजूचं करिअर! शेवटच्या संधीचंही सोनं केलं नाही

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यातही संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे, त्यामुळे आता संजू सॅमसनच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
1/5
घरच्या मैदानातच संपलं संजूचं करिअर! शेवटच्या संधीचंही सोनं केलं नाही
शुभमन गिलचं टीम इंडियात कमबॅक झाल्यानंतर संजू सॅमसनला त्याची ओपनिंगची जागा सोडून मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करावी लागली, पण या क्रमांकावर अपयशी ठरल्यानंतर संजू टीमबाहेर गेला.
advertisement
2/5
शुभमन गिलही टी-20 मध्ये अपयशी ठरत असल्यामुळे त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर बाहेर काढून संजू सॅमसनला पुन्हा एकदा ओपनिंगला बॅटिंग करण्याची संधी दिली गेली, पण या संधीचं सोनं संजूला करता आलं नाही.
advertisement
3/5
न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यात संजूने फक्त 9.20 च्या सरासरीने 46 रन केले. 10, 6, 0, 24 आणि 6 असा स्कोअर संजूने 5 इनिंगमध्ये केला. तिरुवनंतपूरम हे संजू सॅमसनचं होम ग्राऊंड आहे, पण घरच्या मैदानातही संजू फक्त 6 रनवर माघारी परतला.
advertisement
4/5
टी-20 वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाची ही शेवटची मॅच आहे. संजूचा हा फॉर्म बघता त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
advertisement
5/5
संजूला टीमबाहेर केलं तर त्याच्याजागी इशान किशन हा अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला खेळू शकतो. तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादव मैदानात उतरू शकतो. तिलक वर्मा हा वर्ल्ड कपआधी पूर्णपणे फिट झाला तर टीम इंडियाची तिसऱ्या क्रमांकाची चिंता मिटून जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : घरच्या मैदानातच संपलं संजूचं करिअर! शेवटच्या संधीचंही सोनं केलं नाही
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल