
सुनेत्रा पवार हे समाजकारण आणि राजकारणातील एक खंबीर नेतृत्व आहे.विद्या प्रतिष्ठानच्या उभारणीत त्या पहिल्यापासून सहभागी आहेत. पुढे त्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन समितीच्या आणि सिनेट सदस्य झाल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.