
मुंबईत राष्ट्रवादीचे सगळेच नेते शपथविधी सोहळ्याला हजर होते. तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे बारामतीतच हजर होते. शपथविधी सोहळ्याला कुणीही आलं नाही. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर रोहित पवार यांनी सुचक असं ट्वीट केलं.डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही.' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा बारामतीत होत्या. त्यांनी दुपारी अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या.तर शरद पवार हे शपथविधीबद्दल अनभिज्ञ होते.