Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, डबल संकट येतंय, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
फेब्रुवारी महिन्यातील सुरुवातीचे दिवस उबदार आणि स्थिर राहतील. पाहुयात 1 फेब्रुवारीला राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7

1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता नाही. हिवाळ्याचा कडाका कमी होऊन दिवसा तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. सकाळी काही ठिकाणी हलके धुके शक्य असले तरी दुपारनंतर सूर्यप्रकाश प्रबळ असेल. फेब्रुवारी महिन्यातील सुरुवातीचे दिवस उबदार आणि स्थिर राहतील. पाहुयात 1 फेब्रुवारीला राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यत्वे कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 30-32 अंश सेल्सिअस, किमान 22-24 अंश असेल. मुंबईत सकाळी हलके धुके शक्य, पण पाऊस नाही. किनारपट्टीवर उष्णता जाणवेल.
advertisement
3/7
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये कोरडे हवामान असेल. कमाल 30-33 अंश, किमान 18-22 अंश सेल्सिअस राहील. दिवसा उष्णता वाढेल, रात्री थंडी कमी राहील. पावसाची शक्यता नाही.
advertisement
4/7
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असेल. कमाल तापमान 31-34 अंश, किमान 18-21 अंश राहील. घाट भागात हलकी थंडी राहील, पण एकूण दिवस उबदार राहील.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात कोरडे हवामान राहील. कमाल 31-34 अंश, किमान 18-20 अंश अंश राहील. सकाळी धुके असेल तर दिवस ऊन जास्त असेल.
advertisement
6/7
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील. कमाल 32-35 अंश, किमान 18-22 अंश राहील. पूर्व विदर्भात किंचित उष्णता जास्त जाणवेल. परंतु कुठेही पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
एकूणच, 1 फेब्रुवारीला राज्यात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. फेब्रुवारीत तापमान वाढण्याची शक्यता असून, किमान तापमान सामान्य किंवा थोडे जास्त राहील. शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि उष्णतेपासून सावध राहावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, डबल संकट येतंय, हवामान विभागाचा अलर्ट