मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांच्या निधनानंतर मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला. बारामतीत पवार कुटुंबीय अजितदादांच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात व्यस्त होती, त्यावेळी नरेश अरोरा यांचं नाव समोर आलं. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली, याची माहिती घेऊन नरेश अरोरा हे मुंबईत पोहचणार आहे, अशी माहितीही समोर आली होती. आज मुंबईत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे बैठकीला उपस्थितीत होते. ही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होती. या बैठकीला नरेश अरोरा उपस्थितीत होते.
advertisement
काय घडलं बैठकीत?
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुनेत्रा पवार हजर झाल्या. या बैठकीत गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा करत होते. या बैठकीत अरोरा यांनी काही सूचना सुचवल्या होत्या. पुढे काय करता येईल, कुणाला काय जबाबदारी द्यावी, याबद्दल चर्चा होती. पण, अरोरा यांनी सुचवलेल्या मुद्यांवरून वाद झाला. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना अरोरा यांचे मुद्दे अजिबात पटले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. अरोरा यांच्या दिलेल्या सुचनावरून बराच वाद झाला. अखेरीस या बैठकीतून अरोरा बाहेर पडले. त्यानंतर ते शपथविधी सोहळ्याला हजर झालेच नाही. त्यामुळे नरेश अरोरा यांचा पत्ता कट झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यामुळे नरेश अरोरा यांचा पत्ता कट?
एकीकडे मुंबईत राष्ट्रवादीची कोअर कमिटीच्या बैठक आणि शपथविधीची तयारी सुरू होती. तर दुसरीकडे, बारामतीत शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना अंधारात ठेवण्यात आलं होतं, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हा निर्णय सांगण्यात आलाच नव्हता, असा खुलासा केला होता. तसंच, या पत्रकार परिषदेत बोलत असताना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कोण नरेश अरोरा, आपण त्यांना ओळख नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. नरेश अरोरा यांना आपण ओळखत नसल्याचं सांगून शरद पवार यांनी नरेश अरोरा यांचं महत्त्व कमी करून टाकलं, असल्याचं सांगितलं जात आहे.
कोण आहे नरेश अरोरा?
नरेश अरोरा हे रननीतीकार आहे. पुण्यातील डिझाइनबॉक्स्ड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची कंपनी ही राजकीय पक्षांसाठी डिजिटल मीडिया कॅम्पेन, प्रचार व्यवस्थापन, सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंगसाठी काम करते. अरोरा यांची कंपनी २०११ पासून काम करतेय. लाडकी बहिण योजना आल्यानंतर अरोरा यांनी अजितदादांच्या गुलाबी जॅकेट आणि कॅम्पेनची मोहिम राबवली होती. या मोहिमेतून विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या गटाला चांगलाच फायदा झाला होता. त्यामुळे ते अजितदादांचे खास बनले होते. नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसाठी काम करत आहे. अजित पवारांच्या सभांचे नियोजन करणे, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी यासाठी धोरण ही कंपनी आखण्याचे काम केलं होतं. अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या कंपनीचा मोठा वाटा आहे.
अरोरा यांच्या कार्यालयावर झाली होती कारवाई
मात्र, पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रान्चने धडक दिली होती. त्यानंतर अजित पवारांनी या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसंच नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी होती.
