कॅमरून ग्रीन दुसऱ्या टी-20 सामन्यात उस्मान तारिकच्या बॉलिंगवर नाराज दिसत होता, तसंच तो बॉल फेकत असल्याचं ग्रीन म्हणाला. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू असताना 11 व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर उस्मान तारिक बॉल टाकण्यासाठी आला, तेव्हा तो अचानक थांबला आणि त्याने पुन्हा बॉल टाकला. उस्मान तारिक बॉल टाकताना थांबल्यामुळे कॅमरून ग्रीन गोंधळला आणि स्वत:ची विकेट गमावून बसला. आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना ग्रीनने उस्मान तारिक बॉल फेकत असल्याची ऍक्शन केली, याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाचा पराभव
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 90 रननी पराभव झाला आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची ही सीरिजही 2-0 ने गमावली आहे. पाकिस्तानने दिलेलं 199 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा 15.4 ओव्हरमध्ये फक्त 108 रनवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्रीनने 20 बॉलमध्ये सर्वाधिक 35 रन केले. तर मॅथ्यू शॉर्टने 27 आणि कर्णधार मिचेल मार्शने 18 रनची खेळी केली. पाकिस्तानकडून अबरार अहमद आणि शादाब खान यांनी 3-3 विकेट घेतल्या. याशिवाय उस्मान तारिकला 2, सॅम अयुबला 1 आणि मोहम्मद नवाजला 1 विकेट मिळाली.
पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 198 रन केल्या. कर्णधार सलमान आघाने सर्वाधिक 76 रन केले, याशिवाय उस्मान खानने 53, शादाब खानने नाबाद 28 आणि सॅम अयुबने 23 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुन्हेमन, कुपर कॉनली, सीन अबॉट आणि एडम झम्पा यांना 1-1 विकेट मिळाली.
