खरं तर प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरला होता. यावेळी संजू त्याच्या होमग्राऊंडवरही मोठी खेळी करेल असे वाटत होते. पण पाचव्या टी20 त तो फेल ठरला. त्याच्यानंतर अभिषेक शर्मा 16 बॉलमध्ये 30 धावा करून बाद झाला.त्याच्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवची जोडी मैदानात होती.
यावेळी ईशान किशनने पहिल्यांदा 28 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. त्यानंतर पुढे त्यांनी तडाखेबाज फलंदाजी करून 42 बॉलमध्ये शतक ठोकलं.या शतकानंतर तो बाद झाला होता. ईशानने या शतकादरम्यान त्याने 10 षटकार आणि 6 चौकार मारले आहे.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 240 च्या आसपास होता.विशेष म्हणजे हे ईशानच पहिलं टी20 शतक होतं.
ईशान सोबत कॅप्टन सूर्यकुमार यादवने 30 बॉलमध्ये केलेल्या 63 धावांची खेळी केली होती.सूर्यानंतर हार्दिक पांड्याने शेवटच्या क्षणी येऊन 17 बॉलमध्ये 42 धावा केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि एक चौकार मारला आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 247 होता.त्यानंतर रिंकू सिंह 8 आणि शिवम दुबे 7 धावांवर नाबाद राहिला होता. त्यामुळे या धावांच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांची खेळी केली होती.त्यामुळे न्यूझीलंड समोर 272धावांचे आव्हान आहे.
न्यूझीलंडकडू लॉकी फर्ग्युसनने 2, जॅकॉब डफी,कायली जेमिन्सस आणि मिचेल सॅटनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
