पंतप्रधानांनी भारत आणि अरब जगतामधील नागरिकांमध्ये असलेल्या दृढ आणि ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला. हे संबंध वर्षानुवर्षे दोन्ही देशांमधील संबंधांना प्रेरणा देत आहेत आणि मजबूत करत आहेत.
पंतप्रधानांनी आगामी काळातील भारत-अरब भागीदारीसाठीचा आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आणि परस्परांच्या नागरिकांच्या फायद्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि इतर प्राधान्य क्षेत्रांमधील सहकार्य आणखी दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
advertisement
पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनच्या जनतेला भारताचा कायम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आणि गाझा शांतता योजनेसह सध्या सुरू असलेल्या शांतता प्रयत्नांचे स्वागत केले. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अरब लीगने बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
