राज ठाकरे यांची ओळख कट्टर मराठीप्रेमी.. मराठी भाषेसाठी काहीही करण्याची तयारी त्यांची तयारी.. परंतु राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावाच्या चर्चांनी राज ठाकरे काहीसे अस्वस्थ झाले. त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा पुढे करून 'पाटील चालेल-पटेल नको' असे स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना राज्याच्या राजकारणाचा विचका झालाय, असे म्हणत घडत असलेल्या घडामोडींवर नारीजीही व्यक्त केली.
advertisement
राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या 'मनातील पाटील' कोण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष पटेल नको, पाटील असावा, असे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी राज ठाकरे यांच्या मनातील पाटील कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.
