TRENDING:

Vegetable Should Not Eat Raw : 'या' 4 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, सॅलेडमध्ये वापराल तर फायदा नाही उलट उद्भवेल नवीन आजार

Last Updated:
Vegetable Should Not Eat Raw : आपण सगळेच वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. काही जणांना भाज्या शिजवून आवडतात तर काही जणांना कच्च्या सॅलडमध्ये आवडतात. पण सगळ्या भाज्या कच्च्या खाणं शरीरासाठी फायद्याचं नाही तर उलट हानिकारक ठरु शकतं.
advertisement
1/8
'या' 4 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, फायदा नाही उलट उद्भवेल नवीन आजार
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भाज्या शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी किती महत्वाच्या आहे. ज्यामुळे अनेक लोक काही भाज्या कच्च्या खातात. या भाज्या ते कधी सॅलेडमध्ये तर कधी त्याची स्मूथी किंवा ज्यूस म्हणून पितात.
advertisement
2/8
पण तुम्हाला माहितीये काही भाज्या कच्च्या खाल्ल्या तर त्याचा आपल्याला पूर्ण फायदा मिळत नाही? चला या भाज्यांबद्दल जाणून घेऊ ज्या कधीही कच्च्या खाऊ नये.
advertisement
3/8
आपण सगळेच वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. काही जणांना भाज्या शिजवून आवडतात तर काही जणांना कच्च्या सॅलडमध्ये आवडतात. काही लोक तर म्हणतात की भाज्या शिजवण्यापेक्षा कच्च्या खाल्ल्या तर जास्त फायदेशीर असतात. योगा आणि निसर्गोपचार करणारे लोक तर हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. ते तर असंही म्हणतात की भाज्या खाल्ल्या नाहीत तर आजारी पडाल. पण आयुर्वेदात मात्र काही भाज्या कच्च्या खाण्यास मनाई आहे.
advertisement
4/8
काही भाज्या अशा असतात ज्या कच्च्या खाल्ल्या तर त्यातील जीवनसत्त्वे आणि झिंक आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळे त्या भाज्या उकळून, शिजवून किंवा फ्राय करुन खाल्ल्या पाहिजेत. तरच आपल्या शरीराला त्याचा पुरेपूर फायदा मिळतो.
advertisement
5/8
बेगुसराय, बिहारमध्ये राहणारे बीएएमएस डॉक्टर राकेश मिश्रा यांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीत 25 वर्षांचा अनुभव आहे. ते सांगतात, “भाज्या कच्च्या खाल्ल्या तर जास्त फायदेशीर असतात असा एक समज लोकांमध्ये आहे. पण काही भाज्या अशा असतात ज्या कच्च्या खाऊ नयेत.”
advertisement
6/8
आयुर्वेदानुसार अनेक भाज्या कच्च्या खाण्यास मनाई आहे. आजकाल शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे भाज्या कच्च्या खाऊ नयेत. जर भाज्या रासायनिक खतांशिवाय पिकवल्या असतील तरच त्या कच्च्या खाऊ शकतो. बरेच लोक शिमला मिरची कच्ची खातात पण शिमला मिरची कधीही कच्ची खाऊ नये. ती उकळून किंवा शिजवूनच खावी.
advertisement
7/8
शिमला मिरची व्यतिरिक्त कोबी आणि फुलकोबीही कच्ची खाऊ नये. कारण कोबीमध्ये असे अनेक किडे असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. ते कच्चे खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.
advertisement
8/8
डॉक्टर राकेश सांगतात की पालकही कच्चा खाऊ नये. अनेक जण पालक कच्चा किंवा त्याचे तुकडे करून खातात. तर काही लोक त्याचा ज्युस पितात. पण पालकामध्ये अनेक किडे असतात, विशेषतः ई. कोलाय बॅक्टेरिया. हे आपल्या शरीराला हानिकारक असतात. या हिरव्या भाज्यांमध्ये अनेकदा कृमी आढळतात जे आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे या हिरव्या भाज्या हलक्या वाफवूनच खाव्यात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vegetable Should Not Eat Raw : 'या' 4 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, सॅलेडमध्ये वापराल तर फायदा नाही उलट उद्भवेल नवीन आजार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल