TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, हवामानात विचित्र बदल, कोकण ते विदर्भ अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल जाणवत आहेत. 27 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7
महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, हवामानात विचित्र बदल, कोकण ते विदर्भ अलर्ट
महाराष्ट्राच्या हवामानात फेब्रुवारी अखेर मोठे बदल जाणत आहेत. अवकाळी संकट टळलं असून थंडीचा जोर देखील ओसरला आहे. आता बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर पुढील काही दिवस तापमानाचा पारा 2-4 अंशांपर्यंत चढण्याची शक्यता आहे. शुक्रवार 27 फेब्रुवारीचं कोकण ते विदर्भ हवामान अपडेट जाणून घेऊ. हवामान: कोरडे, स्वच्छ/मुख्यत्वे निरभ्र आकाश, उकाडा आणि आर्द्रता जास्त.
advertisement
2/7
फेब्रुवारी महिन्यात मुंबईचा पारा चांगलाच चढला आहे. आज तापमानात काहीशी वाढ झाली असून कमाल तापमान 34-36 अंश तर किमान तापमान 23-25 अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज आहे. आज मुंबईसह कोकण परिसरात पावसाची कोणतीही शक्यता नाही. परंतु, उकाडा हैराण करणार आहे.
advertisement
3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पुन्हा हवापालट झाल्याचे चित्र आहे. आज, शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यत नाही. हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील. दिवसा कडक ऊन तर पहाटे आणि रात्री काहीसा गारवा जाणवेल. कमाल तापमान 31-34 अंश तर किमान 11-15 अंश सेल्सिअसवर राहील.
advertisement
4/7
मराठवाड्यात 3-4 दिवस घोंघावणारं अवकाळी संकट टळलं आहे. आज उष्ण आणि कोरडं हवामान राहील. किमान तापमान 15-18 अंश तर कमाल तापमानाचा पारा 34-36 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीतील सर्वासामान्य तापमानापेक्षा इथं पारा 2-4 अंशांनी वाढण्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
5/7
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज स्वच्छ आकाश राहील. किमान तापमान 14-18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमानाचा पारा 32-36 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. दिवसा तापमानात मोठी वाढ होणार असून हैराण करणारा उकाडा जाणवेल. पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
6/7
नागपूरसह विदर्भातील हवामान आज कोरडे आणि उष्ण राहील. कमाल तापमान 37 पार जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 16-20 अंशांपर्यंत राहील. आज विदर्भाला पावसाचा अलर्ट नाही. परंतु, पूर्व महाराष्ट्रात तापमान सर्वाधिक जास्त राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.
advertisement
7/7
एकंदरीत, महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता नाही, तापमानात हळूहळू वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. दुपारी उन्हात जाणं टाळावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, हवामानात विचित्र बदल, कोकण ते विदर्भ अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल