Health : बोटांमध्ये होतायत वेदना आणि जाणवतेय सूज? 'या' गंभीर आजाराचा असू शकतो इशारा, दुर्लक्ष करणं पडेल महागात
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
बोटांमध्ये होणारी वेदना आणि सूज अनेकदा सामान्य मानली जाते, पण ही समस्या ‘ट्रिगर फिंगर’ नावाच्या गंभीर आजाराचा संकेत असू शकते. हा आजार तेव्हा होतो, जेव्हा बोटांच्या नसांमध्ये सूज येते, ज्यामुळे बोट वाकताना किंवा सरळ करताना वेदना आणि आवाज येतो.
advertisement
1/7

बोटांमध्ये होणारी वेदना आणि सूज अनेकदा सामान्य मानली जाते, पण ही समस्या ‘ट्रिगर फिंगर’ नावाच्या गंभीर आजाराचा संकेत असू शकते. हा आजार तेव्हा होतो, जेव्हा बोटांच्या नसांमध्ये सूज येते, ज्यामुळे बोट वाकताना किंवा सरळ करताना वेदना आणि आवाज येतो. ही एक सामान्य समस्या असली तरी त्यावर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
advertisement
2/7

वारंवार होणारी हालचाल: हा आजार खासकरून अशा लोकांमध्ये दिसून येतो, जे एकाच बोटाची वारंवार हालचाल करतात. जसे की, संगणकावर काम करणारे कर्मचारी, संगीतकार, किंवा शेतीची कामे करणारे लोक.
advertisement
3/7
डायबिटीज आणि संधीवात: डायबिटीज आणि संधीवात यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ‘ट्रिगर फिंगर’ होण्याचा धोका जास्त असतो.
advertisement
4/7
सकाळी उठल्यावर बोट वाकलेले आणि दुखत असेल, बोट वाकताना किंवा सरळ करताना ‘क्लिक’ असा आवाज येत असेल, तर हे ‘ट्रिगर फिंगर’ चे लक्षण असू शकते.
advertisement
5/7
आराम आणि बर्फाचा शेक: जर तुम्हाला बोटात वेदना जाणवत असेल, तर त्या बोटाला पूर्ण आराम द्या. दिवसातून 2-3 वेळा वेदना होत असलेल्या जागेवर बर्फाचा शेक घ्या. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
advertisement
6/7
हलके व्यायाम: बोटात हलका व्यायाम केल्याने स्नायूंची ताकद वाढते. बोट हळू हळू बंद करून उघडा. असे 5-10 वेळा करा. त्यामुळे स्नायू लवचिक राहतील.
advertisement
7/7
डॉक्टरांचा सल्ला: जर वेदना आणि सूज काही दिवसात कमी होत नसेल किंवा बोट जास्त वेळ वाकलेले राहत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर योग्य तपासणी करून उपचाराची योग्य दिशा ठरवतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health : बोटांमध्ये होतायत वेदना आणि जाणवतेय सूज? 'या' गंभीर आजाराचा असू शकतो इशारा, दुर्लक्ष करणं पडेल महागात