गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून बेपत्ता
मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील रहिवासी असलेले डॉ. शुभम यादव हे 2022-23 पासून वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत होते. काल, गणेश विसर्जनाच्या दिवशी ते सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. शोधानंतर, त्यांचा मृतदेह शहरातील एका तलावात आढळला. या घटनेमुळे डॉक्टरच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
सरकारी वकिलाची आत्महत्या
वडवणी शहरात काही दिवसांपूर्वीच एका सहाय्यक सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. यादव यांच्या मृत्यूचे नेमकं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात लवकरच काहीतरी ठोस माहिती समोर येईल अशी शक्यता आहे.
advertisement
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
September 07, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला प्रसिद्ध डॉक्टरचा मृतदेह, वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यूने बीडमध्ये खळबळ!