अमृताला पहिला ब्रेक कसा मिळाला? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमृताने याविषयी सांगितलं. तिने तिच्या करिअरची सुरुवात आणि लाइफ अपडेटविषयी शेअर केलं.
गटार शेजारच्या झोपडीत काढावी लागली रात्र, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ? नेमकं काय घडलं?
अमृता देशमुखने नुकतंच 'सर्व काही' या पॉडकास्टला मुलाखत दिली. यामध्ये तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करत काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, 'सुरुवातीला तिने न्यूज चॅनलमध्ये इंटर्नशीप केली. हे करता करता मी अभिनयाचंही बघत होते.'.
advertisement
अमृता पुढे म्हणाली, "थिएटर ग्रुपसोबत काम करून मला ऑडिशनबाबत समजलं. मुंबईत कुठे ऑडिशन होतात समजलं तर मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि मी अस्मिता मालिकेत एक छोटा ट्रॅक केला."
पहिल्या ब्रेकबद्दल बोलताना अमृता म्हणाली, "अस्मिता मालिकेच्या सेटवर डायरेक्टर प्रतिमा कुलकर्णी आल्या. त्यांच्यासोबत श्रेयस तळपदे आले. ते सेट पहायला आले होते. त्याच्यानंतर मला त्या सेम प्रोजेक्टसाठी कॉल आला. मग मी 2,3 ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झाले. आणि ती स्टार प्रवाहवरची माझी पहिली मालिका होती, 'तुमचं आमचं सेम असतं' नावाची." त्यानंतर तिने काही मालिका, सिनेमे आणि वेब सीरीजमध्ये काम केलं.
दरम्यान, अमृता देशमुख 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. तिने अभिनेता प्रसाद जवादेसोबत 20 नोव्हेंबर 2023 रोजी लग्न केले. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.