TRENDING:

India's Sleep Quality : मुंबईची उडाली झोप, दिल्लीचाही डोळा लागेना! देशातील 'या' शहरांमध्ये झोप झालीय दुर्मिळ..

Last Updated:
Sleep Condition In indian cities : हल्ली लोकांची झोप कमी झालीय. याचं उदाहरण आपल्याला आपल्या घरातही सहज दिसतं. पण तुमच्या संपूर्ण शहरामध्ये झोपेची काय परिस्थिती आहे माहितीये? एका सर्व्हेमध्ये वेगवेगळ्या शहरातील लोकांची झोप किती प्रमाणात कमी झालीय याबद्दलची माहिती समोर आलीय.
advertisement
1/11
मुंबईची उडाली झोप, दिल्लीचाही डोळा लागेना! देशातील 'या' शहरांमध्ये झोप झालीय दुर्मिळ..
भारतातील विविध शहरांमध्ये झोपेच्या समस्या वाढत आहेत. यामुळे आरोग्याच्या इतर समस्याही वाढतायंत. मॅट्रेस बनवणारी कंपनी वेकफिटने एक अहवाल सादर केलाय. त्यातून भारतात अनेक शहरातील लोक खूप कमी झोप घेत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं, अनियमित जीवनशैली आणि वाढता कामाचा ताण हे यामागचे काही महत्त्वाची कारणं असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
advertisement
2/11
लोक लवकर उठतात, पूर्वीपेक्षा कमी झोपतात, रात्री उशिरापर्यंत जगतात आणि जेवढा वेळ झोपतात तेवढ्या वेळात शांत झोपही लागत नाही. यामुळं झोपेची एकूणच गुणवत्ता अनेक शहरांमध्ये खालावत आहे. याचा लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळं हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह, चिंता आणि नैराश्य यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतोय.
advertisement
3/11
कंपनीच्या सर्वेक्षणात देशभरातील अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे. यामध्ये लोकांची झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, निद्रानाश आणि दिवसाचा थकवा या सर्वांचा अभ्यास केला गेला. यानुसार कोणत्या शहरात झोपेची परिस्थिती किती बिकट आहे याबद्दल माहिती दिली गेलीय.
advertisement
4/11
मुंबई : सर्वात आधी मुंबईबद्दल सांगायचं झाल्यास, झोपेच्या बाबतीत मुंबई जास्त त्रस्त आहे. मुंबई मध्ये झोपेच्या समस्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. इथले 76.5 टक्के लोक रात्री उशिरा झोपतात, 42.5 टक्के लोक उशिरा उठतात. शाक्कादायक गोष्ट म्हणजे 62.6 टक्के लोकांना झोपू उठल्यावर सकाळीही थकवा जाणवतो. त्यामुळे 60 टक्के लोकांना कामाच्या वेळेत झोप येते. हे प्रमाणही खूप जास्त आहे. यावरून मुंबईकरांना निवांत झोपेची खूप गरज असल्याचं दिसतं.
advertisement
5/11
दिल्ली : कंपनीच्या अहवालानुसार, दिल्लीतील 45 टक्के लोक उशिरा उठतात. हे प्रमाण यादीतील इतर सर्व शहरांच्या तुलनेत जास्त आहे. तर 32 टक्के लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. म्हणजे दिल्लीतही झोपेची समस्या गंभीर होत चालली आहे. गुरुग्राममधील लोकांनी व्यस्त जीवनशैलीतही आपल्या झोपेकडे लक्ष दिले आहे आणि ते योग्य प्रमाणात झोप घेतात.
advertisement
6/11
बंगळूरू : बंगळूरूच्या सर्वेक्षणात आढळलं की, इथले जवळजवळ 36.3 टक्के लोक मध्यरात्रीनंतर झोपतात. 54 टक्के लोकांना सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही. याचा अर्थ इथले लोक झोप घेतात, मात्र त्यांच्या झोपेची गुणवत्ता खराब आहे. बंगळुरूमधील हे चित्रही झोपेच्या समस्यांचे सूचक आहे.
advertisement
7/11
कोलकाता : कोलकाता रात्री उशिरापर्यंत जागं राहणारं शहर बनलंय. कारण कंपनीच्या अहवालात सांगितलं गेलं की, इथले 75.5 टक्के लोक रात्री उशिरापर्यंत जागतात. या सवयीचा त्यांच्या झोपेवर आणि आरोग्यावर हळूहळू परिणाम होत आहे.
advertisement
8/11
चेन्नई : चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर इथल्या लोकांची झोपेची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. चेन्नईला सर्वात शिस्तबद्ध झोपेचे शहर म्हंटलं गेलंय. इथले लोक ठराविक वेळेवर झोपतात आणि उठतात. इथे रात्री उशिरा झोपणाऱ्यांचे प्रमाण 48.8 टक्के आहे. उशिरा उठणाऱ्यांचे प्रमाण 23.8 टक्के आहे. मात्र इथल्या 61.9 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांना सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. याचा अर्थ असा आहे की केवळ वेळेवर झोपणेच नाही तर चांगली झोप लागणंही महत्त्वाचं आहे.
advertisement
9/11
हैदराबाद : हैदराबादची लोकं बऱ्यापैकी बॅलन्स्ड झोप घेतात. यांच्या झोपेची गुणवत्ता आणि चक्र इतर शहरांच्या तुलनेत काही प्रमाणात व्यवस्थित आहे. इथले 42 टक्के लोक उशिरा झोपतात. मात्र 31 टक्के लोकांना निद्रानाशाची तक्रार आहे.
advertisement
10/11
या अहवालामध्ये सांगितलंय की, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही किंवा इतर कोणत्याही स्क्रीनसमोर जास्तवेळ घालवणं हे झोपेच्या समस्येचं मुख्य कारण आहे. अंदाजे 87.6 टक्के लोक झोपण्यापूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करतात किंवा वेब सिरीज पाहतात. मात्र यामुळे झोपेची गुणवत्ता कमी झालीय. झोपेचा अभाव लोकांच्या कामामध्ये दिसतो. जवळपास 57.8 टक्के लोकांना कामाच्या ठिकाणी झोपे येते.
advertisement
11/11
ही समस्या मोठ्या शहरांत जास्त गंभीर आहे. दिल्लीत 64.4 टक्के, बंगळूरुमध्ये 61.7 टक्के आणि मुंबईत 59.2 टक्के लोक दिवसा झोप येत असल्याचं सांगतात. लोकांना थकवा येण्याचं प्रमाणही यामुळं वाढलंय. जवळपास 48.7 टक्के लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. मुंबई हे प्रमाण 62.6 टक्के, चेन्नईत 61.9 टक्के आणि दिल्लीसारख्या शहरांत 57.4 टक्के एवढं आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
India's Sleep Quality : मुंबईची उडाली झोप, दिल्लीचाही डोळा लागेना! देशातील 'या' शहरांमध्ये झोप झालीय दुर्मिळ..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल