'हामजा'ला डेप्युटी सीएमचा दणका! बॉक्स ऑफिसवर तुफान राडा, सेम डे रिलीजमध्ये DHURANHDAR 2 ला पछाडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 vs Ustad Bhagat Singh Clash: 'धुरंधर २' फिल्मची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असली, तरीही साऊथच्या एका सुपरस्टारने धुरंधरला तगडी टक्कर दिली आहे.
advertisement
1/9

मुंबई : सध्या जिथे बघावं तिथे धुरंधरचीच चर्चा सुरू आहे. १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फिल्मचा दुसरा भाग रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींची कमाई केली आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाची लोकप्रियता पाहता फिल्मचा दुसरा भागही इतिहास रचणार यात शंकाच नव्हती.
advertisement
2/9
अशातच धुरंधर २ रिलीज झाला आणि पेड प्रिव्ह्यू आणि रिलीजच्या पहिल्या दिवसाचं एकत्रित कलेक्शन पाहता, या फिल्मने तब्बल १४५ कोटींची कमाई केली आहे. फिल्मची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असली, तरीही साऊथच्या एका सुपरस्टारने धुरंधरला तगडी टक्कर दिली आहे.
advertisement
3/9
साऊथ सिनेसृष्टीचे पॉवर स्टार पवन कल्याण पडद्यावर येणार म्हटलं की फॅन्स अक्षरशः वेडे होतात. अशातच १९ मार्चला पवन कल्याण यांचा मास-मसाला चित्रपट 'उस्ताद भगतसिंग' रिलीज झाला आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आलं.
advertisement
4/9
मात्र, गेल्या वर्षीच्या फिल्मच्या तुलनेत पवन कल्याण यांची क्रेझ काहीशी कमी पडल्याचं पाहायला मिळालं आहे. 'उस्ताद भगतसिंग'ने पहिल्या दिवशी स्थानिक बॉक्स ऑफिसवर ३१.५० कोटींची कमाई केली. सामान्य चित्रपटासाठी हा आकडा मोठा वाटू शकतो, पण पवन कल्याण यांच्या फॅन फॉलोईंगचा विचार करता हे कलेक्शन फारच कमी आहे.
advertisement
5/9
पवन कल्याण यांच्या गेल्या वर्षीच्या 'OG' चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ९० कोटींची विक्रमी ओपनिंग केली होती. त्या तुलनेत 'उस्ताद'ची ही सुरुवात निम्मीही नाही. तेलगू राज्यांमध्ये या चित्रपटाला ७०% प्रतिसाद मिळाला. मात्र, पवन कल्याण यांच्या क्रेझला साजेसा नाही.
advertisement
6/9
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' ने केवळ उत्तर भारतातच नाही, तर दक्षिण भारतातही अनपेक्षित कमाई करून दाखवली आहे. आश्चर्य म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या शहरी भागांत प्रेक्षकांनी पवन कल्याण यांच्या 'उस्ताद'पेक्षा रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' ला पहिली पसंती दिली.
advertisement
7/9
'धुरंधर २' ने एकट्या तेलगू पट्ट्यात हिंदी + तेलगू व्हर्जन मिळून सुमारे २५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर, 'धुरंधर २' ने देशभरात १०२ कोटी कमावून बॉलिवूडचा इतिहास रचला, ज्याचा थेट परिणाम पवन कल्याणच्या चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला.
advertisement
8/9
'उस्ताद भगतसिंग' हा दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या 'थेरी' या चित्रपटाचा रिमेक आहे. सुरुवातीला हा चित्रपट महिन्याच्या शेवटी रिलीज होणार होता. पण यशचा पॅन-इंडिया चित्रपट पुढे ढकलला गेल्याने, निर्मात्यांनी उगादीचा मुहूर्त साधण्यासाठी 'उस्ताद' लवकर रिलीज केला. मात्र, 'धुरंधर २' सोबत नडणं निर्मात्यांना चांगलंच भारी पडलेलं दिसतंय.
advertisement
9/9
हरीश शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात श्रीलीला आणि राशी खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून, आता वीकेंडला हा चित्रपट सावरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हामजा'ला डेप्युटी सीएमचा दणका! बॉक्स ऑफिसवर तुफान राडा, सेम डे रिलीजमध्ये DHURANHDAR 2 ला पछाडलं