TRENDING:

'तुम्ही कमेंट्समध्ये जी घाण लिहिता...' बिकिनी फोटोंमुळे ट्रोल झाली गोविंदाची भाची, लांबलचक पोस्ट लिहून ट्रोलर्सचं तोंडच बंद केलं

Last Updated:
Arti Singh got trolled: अनेकदा चाहते त्यांच्या मर्यादा विसरतात आणि कलाकारांना त्यांच्या आवडीनिवडीवरून ट्रोल करायला सुरुवात करतात. असाच काहीसा प्रकार सुपरस्टार गोविंदाच्या भाचीसोबत घडला आहे.
advertisement
1/8
बिकिनी फोटोंमुळे ट्रोल झाली गोविंदाची भाची, लांबलचक पोस्ट लिहून ट्रोलर्सचं तोंडच बंद केलं
मनोरंजन विश्वातील कलाकारांसोबत प्रेक्षक खूप जोडलेले असतात. अशातच सोशल मीडियामुळे चाहत्यांना आपल्या कलाकारांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते. आपले आवडते कलाकार त्यांच्या आयुष्यात काय करतात, कसे वागतात हे ते जवळून पाहत असतात.
advertisement
2/8
मात्र, अनेकदा चाहते त्यांच्या मर्यादा विसरतात आणि कलाकारांना त्यांच्या आवडीनिवडीवरून ट्रोल करायला सुरुवात करतात. अशावेळी चाहते विसरतात की त्यांच्या आवडत्या कलाकारांचं एक खाजगी आयुष्य आणि आवडीनिवडीही आहेत. असाच काहीसा प्रकार सुपरस्टार गोविंदाच्या भाचीसोबत घडला आहे.
advertisement
3/8
गोविंदाची भाची आणि 'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री आरती सिंह सध्या तिच्या थायलंड व्हेकेशनमधील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने शेअर केलेल्या बिकिनी फोटोंमुळे एकच गदारोळ उडाला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. त्यावर आता आरतीने सणसणीत उत्तर दिलं आहे.
advertisement
4/8
काही महिन्यांपूर्वीही आरतीसोबत एक घटना घडली होती. आरतीने तिचा पती दीपकसोबतचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसून आली. यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. तिच्या फोटोंवर अश्लील कमेंट्स केल्या. इतकंच नाही, तर तिला अनफॉलो करण्याची धमकीही दिली.
advertisement
5/8
याचाच परिणाम असा झाला होता की आरतीने हे फोटो डिलिट केले होते. पण त्यानंतर आरतीवर भावनिक आघात झाला. आरतीने तिच्या पोस्टमध्ये ही घटना सविस्तर मांडत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे
advertisement
6/8
आरतीने सांगितलं की, फोटो डिलिट केल्यानंतर काही दिवसांतच तिची जवळची मैत्रीण शेफाली जरीवालाचं निधन झालं. या घटनेने आरतीला हादरवून सोडलं. ती म्हणाली, "जेव्हा मी शेफालीला गमावलं, तेव्हा मला जाणीव झाली की आयुष्य किती अनिश्चित आहे. आपण नेहमी 'लोक काय म्हणतील' या विचारात स्वतःच्या इच्छा मारतो. पण शेवटी आपण ज्यांच्यासाठी स्वतःला बदलतो, ते लोक आपल्याला ओळखतही नसतात. मग आपण आपल्याला जे हवंय ते का करू नये?"
advertisement
7/8
आरतीने आपल्या पोस्टमध्ये ट्रोलर्सना उत्तर देत लिहिलंय, "माझं आयुष्य, माझे नियम आणि माझा पेहराव ही माझी स्वतःची निवड आहे. तुम्ही कमेंट्समध्ये जी घाण लिहिता, त्यातून तुमची परवरिश (संगोपन) दिसते, माझे कपडे माझे संस्कार ठरवू शकत नाहीत. ज्यांना अनफॉलो करायचंय त्यांनी खुशाल करा. मी कोणाचंही मन दुखावत नाहीये, मी फक्त माझं आयुष्य जगत आहे."
advertisement
8/8
आरतीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक मुली आणि महिलांनी आरतीच्या या धाडसाचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुम्ही कमेंट्समध्ये जी घाण लिहिता...' बिकिनी फोटोंमुळे ट्रोल झाली गोविंदाची भाची, लांबलचक पोस्ट लिहून ट्रोलर्सचं तोंडच बंद केलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल