चैत्र नवरात्रीत रोज नैवेद्य दाखवत असाल तर मखाणा खीर हा झटपट, पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे. मखाणा खीर पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही खूप सोपी आहे आणि अगदी कमी वेळात तयार होते. पाहूया मखाणा खीर बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.
Children Health : मुलांमधल्या अशक्तपणाची लक्षणं वेळेत ओळखा, नकळतपणे वाढीवर होऊ शकतो परिणाम
advertisement
मखाणा खीरसाठी लागणारं साहित्य - दोन कप मखाणा, एक लीटर दूध, साखर अर्धा कप किंवा आपल्या आवडीनुसार, दोन-तीन मोठे चमचे तूप, अर्धा छोटा चमचा वेलची पूड, दोन मोठे चमचे सुका मेवा यात बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ते आणि मनुका घ्या.
मखाणा खीर बनवण्याची कृती - एका कढईत तूप मध्यम आचेवर गरम करा. तूप गरम झाल्यावर, त्यात मखाणे घालून ते कुरकुरीत होईपर्यंत सतत परतत राहा. थोडेसे तळल्यानंतर, गॅस बंद करा, मखाणे एका ताटलीत काढून ठेवा आणि थोडे थंड होऊ द्या. खीर अधिक घट्ट आणि क्रीमी बनवण्यासाठी, अर्धे मखाणे मिक्सरमधे जाडसर वाटून घेऊ शकता.
एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा पॅनमधे दूध ओता आणि मोठ्या आचेवर उकळी आणा. दुधाला पूर्ण उकळी आल्यावर, आच कमी करा.
उकळत्या दुधात भाजलेले मखाणे घाला. मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटं उकळू द्या. दूध पातेल्याच्या तळाला चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा.
Breakfast : तुमच्या नाश्त्याच्या यादीत हा पदार्थ आहे का ? सोपा आणि सुटसुटीत नाश्ता ठेवेल पोटाला खुश
मखाणे मऊ होतील आणि दूध रबडीसारखं घट्ट होईल, तेव्हा त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखर विरघळेपर्यंत आणखी दोन-तीन मिनिटं उकळू द्या.
आता त्यात चिरलेला सुका मेवा घालून व्यवस्थित मिसळा. स्वादिष्ट आणि पौष्टिक मखाणा खीर तयार आहे. आता तुम्ही गॅस बंद करू शकता.
