TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : राखीचा झाला 'R'B! राकेशने स्वत:च्या हाताने तिच्या 'हृदयावर कोरलं आपलं नाव'

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Raqesh : नाही म्हणता म्हणता अखेर राकेशने राखीच्या 'हृदयावर आपलं नाव कोरलंच', तेही स्वत:च्या हाताने.
advertisement
1/8
Bigg Boss Marathi 6 : राखीचा झाला 'R'B! राकेशने स्वत:च्या हाताने तिच्या 'हृदयावर कोरलं आपलं नाव'
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सध्या कोणती लव्ह स्टोरी चर्चेत असेल तर ती म्हणजे राखी आणि राकेशची. त्यांच्या प्रेमाची चर्चा घरातच नाही तर घराबाहेरही होते.
advertisement
2/8
राखी राखी राकेशच्या मागे हात धुवून लागलेली दिसते, पण राकेश मात्र तिच्यापासून दूर पळताना दिसतो. राकेश भाव देत नसल्याने राखी सतत नाराज असते.
advertisement
3/8
हेच लक्षात घेऊन भाऊचा धक्कावर एकदा या दोघांचं लग्नही लावून देण्यात आलं. पण राकेश राखीला घरातील दुसऱ्या महिला सदस्यांसोबत काही ना काही करून तिला जळवण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
4/8
राकेश आणि राखी यांच्यातील हे लव्ह सीन म्हणजे काही वेळा फक्त मजा वाटते तर काही वेळा ते गंभीर वाटतं. पण नुकतीच राकेशने राखीबाबत काळजीही व्यक्त केली होती आणि आता त्याने तिच्यासाठी असं काही केलं की सगळे थक्क झाले आहेत.
advertisement
5/8
राकेशने चक्क राखीच्या हृदयावर आपलं नाव कोरलं आहे. आता हे वाचून तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण राकेशने राखीच्या मानेवर स्वत:च्या हाताने टॅटू काढला आहे.
advertisement
6/8
बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोत राकेश राखीच्या मानेवर टॅटू काढताना दिसतो. त्याने आधी तिच्या मानेवर एक हार्ट काढला. ज्यात त्याने R हे इंग्रजी अक्षर आहे.
advertisement
7/8
राकेश राखीला टॅटू काढताना सांगतो. राखी हे तुला हवं म्हणून मी करतोय. तू माझी कस्टमर आहे. मागे उभी असलेली रेवा या दोघांना गाणं बोलत चिडवते.
advertisement
8/8
आता R म्हणजे राकेश, राखी आणि रेवा यांच्या नावाचं पहिलं अक्षर. त्यामुळे रेवा राखीला तू माझं नाव का स्वत:च्या मानेवर लिहिते आहे, माझ्यावर इतकं प्रेम, असंही म्हणते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : राखीचा झाला 'R'B! राकेशने स्वत:च्या हाताने तिच्या 'हृदयावर कोरलं आपलं नाव'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल