पाण्याची बाटली करेल घात, थेट तुमच्या Private Part वर होईल परिणाम, होणार नाही मूल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल, तर तुम्हीही या आजारांचे बळी ठरू शकता. ही गोष्ट जर तुम्हाला किरकोळ वाटत असेल, तर आताच सावध व्हा.
advertisement
1/7

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कालांतराने अनेक बॅक्टेरिया वाढू लागतात. जर एकाच बाटलीतून खूपजण पाणी पित असतील तर यामुळे अनेक आजारांचा धोका बळावतो. बाटलीतील बॅक्टेरिया अगदी सहज एका माणसापासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. ही गोष्ट जर तुम्हाला किरकोळ वाटत असेल, तर आताच सावध व्हा. यामुळे कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतोय.
advertisement
2/7
तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल, तर तुम्हीही या आजारांचे बळी ठरू शकता. यामध्ये शिसे, कॅडमिअम आणि पारा असे घटक आढळतात, जे गंभीर आजार होण्याचे कारण ठरतात. यामुळे कोणते आजार वाढू शकतात, ते जाणून घ्या.
advertisement
3/7
प्लास्टिकच्या बाटलीच्या वापराबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा प्लास्टिकची पाण्याची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती सूक्ष्म प्लास्टिक पाण्यात सोडू लागते. हे सूक्ष्म प्लास्टिक कण शरीरात अनेक प्रकारच्या समस्यांना जन्म देऊ शकतात. यामुळे अति प्रमाणात हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व आणि यकृत संबंधित रोगांचा धोका वाढू शकतो.
advertisement
4/7
जर तुम्ही एकच पाण्याची बाटली खूप काळ वापरत असाल, तर त्यामुळे अनेक हार्मोनल विकारांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जर प्लास्टिकच्या बाटल्या जास्त काळ वापरल्या गेल्या तर पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
advertisement
5/7
त्याच वेळी, मुलींमध्ये लवकर यौवन होण्याची शक्यता असते. बाटलीबंद पाण्याच्या वापरामुळे यकृत आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.
advertisement
6/7
जर तुम्हाला दम्यासारखे श्वासाशी संबधित आजार असतील तर तुम्ही तुमची पाण्याची बाटली कोणासोबत शेअर करू नये. असे केल्याने त्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
ओरल इंफेक्शन असणाऱ्या लोकांनी त्यांची पाण्याची बाटली कोणालाही वापरायला देऊ नये. यामुळे हे इंफेक्शन इतर लोकांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पाण्याची बाटली करेल घात, थेट तुमच्या Private Part वर होईल परिणाम, होणार नाही मूल