कढई तवा अन् ग्लास, पुण्यात फक्त 10 रुपयांत मिळतायेत मातीची भांडी, Photos
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
मातीची भांडी कुंभारवाड्यात जाऊन घेतली तर स्वस्त दरात हवी तशी तपासून घेता येतील.
advertisement
1/9

हल्ली घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात. बऱ्याचदा सिनेमामधील एखाद्या घरात पाहिलेलं इंटेरिअर आपल्या घरात वापरण्याचाही प्रयोग केला जातो. तसेच इतरांच्या घरात दिसणार नाहीत अशा अँटिक वस्तू घरात आणण्याचा विचार असतो.
advertisement
2/9
आपणही असाच विचार करत असाल तर आपल्यासाठी मातीची भांडी उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यात</a> विविध मातीची भांडी केवळ 10 रुपयांपासून मिळत आहेत. शिवाजीनगरच्या बाजूने येताना डेंगळे पूल संपला की कुंभारवेस सुरू होते. अर्थात ‘वेस’ म्हणता येतील असे कोणतेही अवशेष सध्या शिल्लक नाहीत. मात्र, या परिसराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे.
advertisement
3/9
या ठिकाणी असणाऱ्या दुकानांमध्ये तुम्हाला 10 रुपयांपासून मातीच्या वस्तू मिळतील. कुंभारवाड्यात गेलो तर मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार पहायला मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील.
advertisement
4/9
मातीची भांडी घ्यायची असतील तर साधारण 10 रुपयांपासून ते 500 रुपये मोजावे लागतात. या ठिकाणी 10 रुपयाला चहाचा कप आणि 200 रुपयाला मोठी कढई मिळते. तुम्ही जर एखाद्या मोठ्या शो रूम मधून किंवा हायवे जवळून किंवा ऑनलाईन ही भांडी विकत घेतली तर ती यापेक्षा नक्कीच महाग मिळतील.
advertisement
5/9
मातीची भांडी कुंभारवाड्यात जाऊन घेतली तर स्वस्त दरात हवी तशी तपासून घेता येतील. मातीच्या भांड्यामध्ये फक्त माठ नाही तर पाण्याची बाटली, कढई, तवा, दिवे, ग्लास, कप, असे खूप प्रकार पाहायला मिळतात.
advertisement
6/9
तुम्हाला सुद्धा जर तुमच्या किचनमध्ये जास्त टिकाऊ आणि स्वस्त भांडी हवी असतील तर मातीची भांडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता, अशी माहिती दुकानदार सांगतात.
advertisement
7/9
आधुनिक किचनमध्ये मातीच्या भांड्यांचा थाट वाढतो आहे. वाटी, पातेले आदींपासून ते तवा, माठ यांच्या किमती शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत आहेत. आता पुन्हा एकदा घराघरात मातीची भांडी दिसू लागली आहेत. मातीचा तवा, हंडी, कडई, कुकर अशा वस्तू विविध आकारांड आणि लाल आणि काळ्या रंगांत बाजारात उपलब्ध आहेत.
advertisement
8/9
मोठमोठ्या प्रदर्शनामध्येही मातीची भांडी हमखास पाहण्यास मिळतात. 100 रुपयांपासून दीड हजारांपर्यंत ही मातीची भांडी खरेदी करता येतात. मातीच्या भांड्यांच्या खरेदीत गेल्या तीन वर्षांत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
advertisement
9/9
या भांड्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास ती 7 ते 8 वर्षे टिकतात. जुनी जाणती मंडळी आजही मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंत करतात, अशी माहिती यावेळी दुकानदारांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कढई तवा अन् ग्लास, पुण्यात फक्त 10 रुपयांत मिळतायेत मातीची भांडी, Photos