TRENDING:

Quiet Dating Trend : बिनधास्त Gen Z ला का आवडतंय लपून प्रेम करणं? समोर आला नवा Quiet Dating ट्रेंड!

Last Updated:
Gen z new relationship trend : गेल्या काही वर्षांत जेन झींमुळे डेटिंग ट्रेंडमध्ये खुप बदल झाले आहेत. असंख्य पर्याय आणि डेटिंग अॅप्समुळे आजच्या पिढीसाठी नवीन लोकांना भेटणे सोपे झाले आहे. मात्र याउलट आता हेच Gen Z आता Quiet Dating कडे वळत आहेत. चला पाहूया हे नेमके काय आहे.
advertisement
1/7
बिनधास्त Gen Z ला का आवडतंय लपून प्रेम करणं? समोर आला नवा Quiet Dating ट्रेंड!
पूर्वीच्या काळी घरच्यांच्या भीतीने किंवा समाजाच्या भीतीने लोक लपूर्ण छपून भेटत. आता तशी फारशी परिस्थिती राहिली नाही आणि जेन झी तर सगळी बंधनं झुगारून पुढे जाणारी पिढी आहे. मात्र ही लोकंही हल्ली Quiet Dating ट्रेंड फॉलो करताना दिसतायंत. चला पाहूया असे का?
advertisement
2/7
जागरणमध्ये ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, Quiet Dating म्हणजे शांतपणे आणि गुप्तपणे डेटिंग करणे. यामध्ये जेन झी एकमेकांना भेटता, डेटवर जातात मात्र याबद्दल फार लोकांना सांगत नाही.
advertisement
3/7
नातं नवीन असल्यावर हा नियम काटेकोरपणे पळाला जातो. तसेच या डेटिंगमध्ये असताताना लोक आपल्या नात्याविषयी सोशल मीडियावर स्टेटस पोस्ट करत नाही. यामुळे तुम्हाला इतर लोकांच्या कोणत्याही दबावाशिवाय तुमचे नाते आणि एकमेकांना समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळतो.
advertisement
4/7
तज्ञांच्यामते, आपण आपल्या नात्याबद्दल फार लोकांना सांगितले तर त्यांच्या टिप्पण्यांचा आपल्या निर्णयावर आणि विचारांवर परिणाम होतो. काहीवेळा हे चुकीच्या दिशेने जाते. म्हणून या डेटिंग पद्धतीत मुलं नात्याबद्दल किंवा डेटबद्दल सर्वांना सर्वकाही सांगत नाहीत.
advertisement
5/7
या नात्याबद्दल जास्त कोणाला माहिती नसल्यामुळे कोणाचाही दबाव राहात नाही. त्यामुळे नंतर हे नातं समजून घ्यायला आणि काही कारणास्तव नातं संपल्यास त्यातून बाहेर पडणं, विसरणं सोपं जातं आणि पर्यायाने त्रासही कमी होतो.
advertisement
6/7
या डेटिंग पद्धतीत सोशल मीडियावर 'आमचं नातं कसं बेस्ट' हे दाखवण्याची शर्यत नसते. म्हणून तुम्ही दिखाव्यापासून दूर राहता आणि तुम्हाला तुमच्या नात्यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Quiet Dating Trend : बिनधास्त Gen Z ला का आवडतंय लपून प्रेम करणं? समोर आला नवा Quiet Dating ट्रेंड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल