TRENDING:

Quitting Alcohol : दारू नक्कीच सोडा, पण अचानक नको; अन्यथा या 5 समस्यांचा करावा लागू शकतो सामना

Last Updated:
Problems After Quitting Alcohol : दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे माहीत असूनही लोक दारू पिणे सोडत नाहीत. काही लोकांना त्याचे असे व्यसन लागते की ते सोडणे सोपे नसते. मात्र, दारू सोडणे अशक्य नाही. कारण असे बरेच लोक आहेत, जे अचानक दृढ संकल्पाने दारू सोडतात. पण अशाप्रकारे अचानक दारू सोडल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असे करणे योग्य आहे का? त्याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होतो का? या समस्यांवर उपाय काय आहेत? GTB हॉस्पिटल दिल्ली मेडिसिन युनिट हेड डॉ. अमितेश अग्रवाल याबद्दल सविस्तर सांगत आहेत.
advertisement
1/5
दारू नक्कीच सोडा, पण अचानक नको; अन्यथा या 5 समस्यांचा करावा लागू शकतो सामना
नैराश्य : डॉ. अमितेश अग्रवाल सांगतात की, जर तुम्हाला दारूचे व्यसन असेल तर ते हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा. कारण, अचानक दारू पिणे सोडल्याने डिप्रेशनसारखी स्थिती उद्भवू शकते. दारूच्या वारंवारच्या लालसेमुळे व्यक्ती मानसिकरित्या अस्वस्थ होते, ज्यामुळे त्याला चिडचिड आणि दुःखी वाटते.
advertisement
2/5
डोकेदुखी : डॉक्टरांच्या मते, अचानक दारू सोडल्यानंतर डोकेदुखीची समस्या सामान्य आहे. ही वेदना काहींना कमी तर काहींना जास्त असू शकते. यासोबतच भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.
advertisement
3/5
नियंत्रण गमावणे : तज्ञांच्या मते, अचानक दारू सोडल्यास अनेकांना चिंता आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या परिस्थितीत, कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि जलद हृदयाचा ठोका यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात.
advertisement
4/5
बद्धकोष्ठता : डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांना नेहमी पोटाशी संबंधित समस्या असतात. परंतु, दारू सोडल्यानंतर ते अधिक जाणवू शकते. अशा परिस्थितीत जास्त वेळ विश्रांती घेणे चांगले.
advertisement
5/5
तज्ज्ञांचा सल्ला : डॉ अमितेश अग्रवाल म्हणतात की, दारू सोडणे ही चांगली गोष्ट आहे. पण, अचानक सोडणे टाळले पाहिजे. कारण असे केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांमुळे कंटाळा येऊन पुन्हा दारू पिण्यास सुरुवात करू नये, यासाठी तुम्ही स्वत:ला मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवले पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टरांची मदत घेत राहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Quitting Alcohol : दारू नक्कीच सोडा, पण अचानक नको; अन्यथा या 5 समस्यांचा करावा लागू शकतो सामना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल