TRENDING:

Kitchen Tips : भाजीला पाणी सुटतंय? चव देखील बिघडतेय? स्वयंपाकात नकळत तुम्ही 'या' चुका करताय का?

Last Updated:
हे सहसा पाल्याच्या भाजीसोबत होतं किंवा कोणत्याही फळभाज्यांसोबत होतं. ज्यामुळे कधीकधी भाजीची चव बिघडते.
advertisement
1/10
भाजीला पाणी सुटतंय? चव देखील बिघडतेय? स्वयंपाकात नकळत तुम्ही 'या' चुका करताय का?
सकाळी उठल्यापासून आपण महिलांची एकच धावपळ सुरू असते. डबा काय द्यायचा? नाश्त्याला काय करायचं? मुलांच्या आवडीचं आणि साहेबांच्या पथ्याचं सांभाळता सांभाळता त्यांची मात्र त्रेधातिरपीट उडते. त्यात कधीतरी अगदी मन लावून आपण एखादी भाजी करायला घेतो, पण फोडणीला एखादी भाजी घातली की थोड्याच वेळात त्याला पाणी सुटायला लागतं. मग ती सुकी भाजी होण्याऐवजी तिचा पातळ होतो किंवा चव तरी बिघडते. हे सहसा पाल्याच्या भाजीसोबत होतं किंवा कोणत्याही फळभाज्यांसोबत होतं. ज्यामुळे कधीकधी भाजीची चव बिघडते.
advertisement
2/10
असं झालं की आपला मुड तर जातोच, पण एवढी मेहनत वाया गेल्यासारखी वाटते. कधी मिठाचा अंदाज चुकतो, तर कधी कढईवर झाकण ठेवल्यामुळे ही पंचायत होते. पण काळजी करू नका, स्वयंपाक करताना अशा चुका आपल्या कोणाकडूनही होऊ शकतात. भाजीला पाणी का सुटतं आणि ते कसं टाळता येईल, याच्या काही खास टीप्स आज आपण पाहणार आहोत.
advertisement
3/10
1. मिठाचा वापर कधी करावा?आपल्याला सवय असते की फोडणीत कांदा-टोमॅटो टाकला की लगेच मीठ टाकतो. पण विशेषतः कोबी, मेथी, भेंडी किंवा दुधी भोपळा यांसारख्या भाज्या करताना मीठ सुरुवातीला टाकलं की त्या पाणी सोडायला लागतात.त्यामुळे भाजी 70-80% शिजली की मगच शेवटी मीठ घाला. यामुळे भाजीचा पोत टिकून राहतो.
advertisement
4/10
2. धुणे आणि चिरणे यातला फरकघाईच्या वेळी आपण भाज्या चिरतो आणि मग धुतो. असं केल्यामुळे भाजीमध्ये जास्त ओलावा राहतो. खासकरून पालेभाज्या किंवा भेंडीच्या बाबतीत हे जास्त घडतं.भाजी नेहमी चिरण्यापूर्वी धुवा आणि ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या. जर वेळ नसेल, तर स्वच्छ कपड्याने पुसून मगच चिरायला घ्या.
advertisement
5/10
3. झाकण ठेवण्याची घाईभाजी लवकर शिजावी म्हणून आपण कढईवर ताट ठेवतो. पण वाफेमुळे ताटाच्या खालच्या बाजूला पाणी जमा होतं आणि तेच पाणी भाजीत पडतं. यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्याची चव बिघडते.सुकी भाजी करताना सुरुवातीला काही वेळ झाकण न ठेवता परता. जर झाकण ठेवायचं असेलच, तर अधूनमधून ते काढून वाफ बाहेर जाऊ द्या.
advertisement
6/10
4. गॅसची फ्लेम (आच) कमी असणेअनेकदा आपण विचार करतो की 'मंद आचेवर' भाजी छान होईल. पण काही भाज्या जसे की मशरूम किंवा कोबी जर कमी आचेवर शिजवल्या, तर त्या स्वतःचं पाणी सोडतात.पाण्याचा अंश जास्त असलेल्या भाज्या नेहमी मध्यम ते मोठ्या आचेवर (High Flame) परतून घ्या. यामुळे पाणी लवकर आटतं आणि भाजी कुरकुरीत राहते.
advertisement
7/10
5. मसाला आणि तेल यांचा अंदाजजर फोडणीत तेल खूपच कमी असेल किंवा मसाले नीट परतले गेले नसतील, तर भाजीतील पाण्याचा अंश बाहेर पडायला जागा मिळते. मसाल्यांनी तेल सोडलं की भाजीला एक वेगळाच ग्लो येतो.
advertisement
8/10
जर भाजीला पाणी सुटलंच, तर काय करावं?कधीकधी सगळी काळजी घेऊनही भाजीला पाणी सुटतं. अशा वेळी घाबरून न जाता हे दोन उपाय करून पहा:शेंगदाण्याचा कूट: एक-दोन चमचे दाण्याचं कूट किंवा सुकं खोबरं घातल्यास ते जास्तीचं पाणी शोषून घेतं.बेसन: भाजीमध्ये थोडं बेसन पीठ भाजून घातल्यास भाजीला छान बाइंडिंग येतं आणि चवही वाढते.
advertisement
9/10
स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि त्यात थोड्या चुका होणं अगदीच साहजिक आहे. फक्त या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमची प्रत्येक भाजी हॉटेलसारखी परफेक्ट होईल आणि घरातले सगळे तुमचं कौतुक करतील
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kitchen Tips : भाजीला पाणी सुटतंय? चव देखील बिघडतेय? स्वयंपाकात नकळत तुम्ही 'या' चुका करताय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल