शेवग्याच्या शेंगांचं आरोग्यदायी सूप, डॉक्टरही देतात पिण्याचा सल्ला, लगेच नोट करा रेसिपी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
शेवगा हा अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. अनेकदा डॉक्टरही रुग्णांना शेवग्याच्या शेंगाचं सूप पिण्याचा सल्ला देतात.
advertisement
1/7

शेवगा हा आरोग्याचा खजिना मानला जातो. शेंगांसोबतच अगदी पानांची भाजीही आरोग्यदायी असते. प्रथिने, फायबर, कॅल्शिअम आदींचा स्त्रोत म्हणून शेवग्याचं आहारशास्त्रात महत्त्व आहे. शेवग्याच्या विविध रेसिपी बनवल्या जातात. शेवग्याच्या शेंगांचं सार किंवा सूप हे सुद्धा अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी या सूपची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
2/7
शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार शेंगा घ्याव्यात. तसेच हिरवी इलायची, काळी मिरी, मीठ, हळद, लिंबू, सोप, धने, दालचिनी हे साहित्य लागेल.
advertisement
3/7
एका पातेल्यात गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. या शेंगा अगदी मऊसूद होईपर्यंत म्हणजेच त्याचा गर निघेल इतक्या गाळ शिजवून घ्यायच्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सोप धने, काळीमिरी, हिरवी इलायची हे टाकून ते सगळं बारीक करून घ्यायचं.
advertisement
4/7
तयार झालेलं हे मिश्रण उकळायला ठेवलेल्या शेंगांमध्ये टाकायचं. दालचिनीचा तुकडा बारीक न करता तसाच त्या मिश्रणामध्ये टाकायचा आणि चांगलं शिजवून घ्यायचं.
advertisement
5/7
शेंगांच मिश्रण बारीक चाळणीमध्ये टाकायचं. त्याचा सर्व गर काढून घ्यायचा. त्यानंतर जो गर निघलेला आहे. तो एका भांड्यात टाकून गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचा. त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची.
advertisement
6/7
सर्विंग करण्यासाठी हे तयार झालेले सूप एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि वरून लिंबू पिळायचा. अशा पद्धतीनं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार होतं.
advertisement
7/7
शेवग्याच्या शेंगाचं हे आरोग्यदायी सूप अगदी कमी साहित्यात आपण घरच्या घरी तयार करू शकता. आजारी रुग्णांना हे सूप पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. त्यामुळे ही रेसिपी ट्राय करू शकता. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
शेवग्याच्या शेंगांचं आरोग्यदायी सूप, डॉक्टरही देतात पिण्याचा सल्ला, लगेच नोट करा रेसिपी