जेवणाची वाढेल आंबा पुदिना चटणीने चव; घरीच तयार करा झटपट रेसिपी
- Published by:pradip srivastava
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अनेकजण कच्ची कैरी आणि पुदिन्याच्या पानांची चटणी बनवतात. 2 मिनिटांत तयार होणारी ही झटपट रेसिपी जेवणाची चव वाढवते.
advertisement
1/6

उन्हाळ्यात कैरी सहज उपलब्ध असते. त्यामुळे या काळात आंबा किंवा कच्चा कैरीचे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात. अनेकजण कच्ची कैरी आणि पुदिन्याच्या पानांची चटणी बनवतात.
advertisement
2/6
2 मिनिटांत तयार होणारी ही झटपट रेसिपी जेवणाची चव वाढवते. पुदिन्याची पाने ही थंडावा देणारी मानली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात ही आंबा पुदिना चटणी बनवायची कशी? हे येथील गृहिणी स्नेहल मुळे यांनी सांगितले आहे.
advertisement
3/6
आंबा पुदिना चटणी साहित्य : आंबा पुदिना चटणीसाठी घरातीलच साहित्य गरजेचं असतं. त्यासाठी वाटीभर कैरीचे काप घ्यावेत. तसेच वाटीभर गूळ, 1 वाटी पुदिन्याची पाने, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, 6-7 लसूण कळ्या, 2 हिरव्या मिरच्या, मीठ आदी साहित्य ही रेसिपी बनवण्यासाठी लागेल.
advertisement
4/6
कशी बनवायची चटणी? सर्वप्रथम आंबा पुदिना चटणीसाठी आंबा आणि पुदिना हे मुख्य साहित्य लागेल. उन्हाळ्यात कच्ची कैरी सहज उपलब्ध होते. या कच्चा कैरीचे काप करून मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यावेत.
advertisement
5/6
त्यात गूळ, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण कळ्या आणि गरज वाटल्यास थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. यानंतर ही चटणी खाण्यासाठी तयार होते.
advertisement
6/6
आंबा पुदिना चटणी स्वादिष्ट लागते. ही चटणी फ्रिजमध्ये चांगली राहू शकते. जेवताना ही चटणी खाल्ल्यास तिची चव थंडगार आणि खास वाटते. त्यामुळे उन्हाळ्यात ही चटणी नक्की ट्राय करू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
जेवणाची वाढेल आंबा पुदिना चटणीने चव; घरीच तयार करा झटपट रेसिपी