घरगुती साहित्यापासून बनवा पाकपुरी, पारंपरिक पदार्थांची चव नेहमी राहील जिभेवर रेंगळत
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सध्याच्या काळात पारंपरिक पदार्थांकडे लोकांचा कल वाढत आहे. रसरशीत आणि खुसखुशीत पाकपुरीची रेसपी अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकता.
advertisement
1/7

सध्याच्या काळात पारंपरिक पदार्थ हे फक्त काही विशिष्ठ वेळीच बनवले जातात. त्यामुळे काही पदार्थ मागे पडलेत. पण, पारंपरिक पदार्थांची चव मात्र नेहमी जिभेवर रेंगळत राहील अशीच असते. असाच एक पदार्थ म्हणजे पाकपुरी. अगदी घरगुती साहित्यापासून तयार होणारा पदार्थ आहे. आंबट गोड अशी चव असणारा हा पदार्थ कमीत कमी वेळात कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील गृहिणी रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
advertisement
2/7
पाकपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : मैदा, रवा, साखर, दही, विलायची, चवीपुरते मीठ, पुरी तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.
advertisement
3/7
सर्वात आधी आपण मैदा आणि रवा दही टाकून भिजवून घ्यायचा आहे. एका भांड्यात तीन मोठे चमचे मैदा आणि 1 मोठा चमचा रवा टाकून घ्यायचा आहे. हे प्रमाण व्यवस्थित होते. जास्त टाकायचे असल्यास तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता. तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा पाकपुरी बनवू शकता.
advertisement
4/7
आता यात मीठ टाकून ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यात दही टाकून घ्यायचं. मिश्रण आपल्याला दही टाकूनच भिजवायचे आहे, त्यामुळे लागेल त्या प्रमाणात दही टाकायचं आहे. मिश्रण भिजवताना ते एकदम सैल किंवा एकदम कडक करायचं नाही. तर मध्यम ठेवायचं आहे. भिजवून तयार झालेलं मिश्रण म्हणजेच लाटी बाजूला ठेऊन काही वेळ सेट होऊ द्यायची आहे. तोपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे.
advertisement
5/7
पाक तयार करण्यासाठी सर्वात आधी भांडे गॅसवर ठेवून त्यात मोठी अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची. साखर प्रमाणानुसार घ्यावी लागते. त्यानंतर त्यात साखर भिजेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी आणि साखर व्यवस्थित मिक्स करून पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक पुरीसाठी आपल्याला एक तारीच पाक लागतो. त्यामुळे जास्त वेळ शिजवायचा नाही. पाक झाला की नाही यासाठी चमच्याला थोडा पाक घेऊन तो भांड्यात पडू द्यायचा. शेवटचा थेंब जेव्हा पडून त्याचा काही भाग वर जातो किंवा थेंब पडायला थोडा वेळ घेतो तेव्हा समजायचं की एक तारी पाक तयार झाला आहे. नंतर त्यात विलायची टाकून घ्यायची आहे.
advertisement
6/7
पाक झाकून ठेवून द्यायचा आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही एक एक करून पण लाटून घेऊ शकता. किंवा मग एक मोठी पोळी करून त्याच्या ग्लासच्या साहाय्याने छोट्या पुरी करून घेऊ शकता. पुऱ्या लाटून झाल्या की तेलात किंवा तुपात तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात पुरी तळून घ्यायची. पुरी छान गोल्डन ब्राऊन कलर येत पर्यंत तळून घ्यायची आहे.
advertisement
7/7
अशाप्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आणि गरम गरम पाकात टाकून घ्यायच्या. पाकात थोड्या परतवून घेऊन 5 मिनिटानंतर पाकातून काढून घ्यायच्या. त्यानंतर कुरकुरीत आंबट गोड अशी पाक पुरी तयार होते. तुम्ही देखील घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आंबट गोड अशी पाकपुरी बनवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
घरगुती साहित्यापासून बनवा पाकपुरी, पारंपरिक पदार्थांची चव नेहमी राहील जिभेवर रेंगळत