शंकरपाळ्यापासून चटपटीत चाट घरीच बनवायचंय? ही सोपी पद्धत पाहा बनेल टेस्टी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडणारा पदार्थ म्हणजे चाट. त्यामुळे शंकरपाळ्यापासून झटपट चाट कसं तयार करायचं? पाहा
advertisement
1/6

नवनवीन पदार्थ करून खायला आपल्या सर्वांना आवडत असतात. त्यातल्या त्यात जर चटपटीत चाट असेल तर सर्वजण अगदी आवडीने खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडणारा पदार्थ म्हणजे चाट. त्यामुळे शंकरपाळ्यापासून झटपट चाट कसं तयार करायचं? याबद्दलच <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> मधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
2/6
मोठ्यांसाठी शंकरपाळ्याचे चाटसाठी लागणारे साहित्य : तिखट शंकरपाळे, इडलीसाठी जे सांबार बनवतो ते सांबर, बारीक शेव, घरी तयार केलेले तिखट शेव, कांदा, डाळिंबाचे दाणे हे साहित्य लागेल.
advertisement
3/6
शंकरपाळ्याच्या चाटची कृती : सर्वप्रथम एका डिशमध्ये शंकरपाळे घ्यायचे त्यावरती सांबार घालायचे. सांबार हा जास्त पातळ नसावा तो घट्ट असावा. पूर्ण शंकरपाळ्यांना कव्हर करील एवढे त्यावरती सांबर घालायचे. त्यानंतर त्याच्यावरती घरी तयार केलेली शेव घालायची. नंतर कांदा घालायचा आणि बारीक शेव घालायची. वरतून डाळिंबाचे दाणे घालायचे ही झाली मोठ्यांसाठी झटपट चाटची रेसिपी तयार, असं मेघना देशपांडे सांगतात.
advertisement
4/6
मुलांसाठी शंकरपाळ्याचे चाट करण्यासाठी लागणारे साहित्य : मसाले शंकरपाळे, बारीक शेव, कांदा, दही, गोड चटणी, हिरवी चटणी, लाल पेरू आणि सफरचंदाच्या बारीक फोडी, डाळिंबाचे दाणे आणि चवीनुसार मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
5/6
शंकरपाळ्याच्या चाटची कृती : सर्वप्रथम एका डिशमध्ये मसाले शंकरपाळे घ्यायचे त्यावरती घट्ट दही टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती गोड चटणी टाकायची त्यानंतर हिरवी चटणी टाकायची. किंवा तुम्ही पाणीपुरीचं तिखट पाणी देखील टाकू शकता.
advertisement
6/6
नंतर बारीक चिरलेला सफरचंद आणि लाल पेरू वरतून टाकायचा. डाळींबाचे दाणे टाकायचे आणि भरपूर अशी बारीक शेव टाकायची. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तुमचा हा शंकरपाळ्याचा अगदी टेस्टी चाट तयार होईल,असंही मेघना देशपांडे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
शंकरपाळ्यापासून चटपटीत चाट घरीच बनवायचंय? ही सोपी पद्धत पाहा बनेल टेस्टी