Sangali: दिसायला क्यूट पण पाहून सांगलीकरांची हवा टाइट, त्याला बघताच उसाच्या फडात खळबळ उडाली, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शिराळा तालुक्यातील कापरी येथे अविनाश निकम यांच्या शेतात ऊसतोडीवेळी बिबट्याचा बछडा आढळला. वन विभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सने बछड्याला सुरक्षित ताब्यात घेतले.
advertisement
1/7

आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली: जिल्ह्यातील शिराळा तालुका हा वन्यजीवांच्या वावरासाठी ओळखला जातो. याच तालुक्यातील कापरी येथे एका उसाच्या फडात बिबट्याचा बछडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
2/7
ऊसतोड सुरू असताना हा बछडा मजुरांच्या नजरेस पडला. सुदैवाने, वन विभाग आणि रेस्क्यू टीमने वेळीच धाव घेत बछड्याला सुरक्षित ताब्यात घेतले असून आता त्याची मादीशी पुनर्भेट घडवून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
3/7
कापरी येथील शेतकरी अविनाश निकम यांच्या शेतात काल सायंकाळच्या सुमारास ऊसतोडीचे काम सुरू होते. ऊसतोड मजूर आपल्या कामात मग्न असताना अचानक त्यांना उसाच्या पाचोळ्यात बिबट्याचा एक लहान बछडा बसलेला दिसला. बिबट्याचा बछडा पाहताच मजुरांची एकच धावपळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मजुरांनी तातडीने याची कल्पना शेतमालकाला दिली.
advertisement
4/7
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'च्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव तज्ज्ञांनी बछड्याची तपासणी केली असता तो पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. बछड्याला मानवी स्पर्श होणार नाही आणि तो सुरक्षित राहील याची पूर्ण काळजी पथकाने घेतली.
advertisement
5/7
वन्यजीव नियमांनुसार, बछड्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मादी बिबट्याकडे सोपवणे गरजेचे असते. त्यादृष्टीने काल रात्री उशिरापासून वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या ठिकाणी बछडा सापडला, त्याच परिसरात त्याला सुरक्षित ठेवून मादी बिबट्या तिथे येते का, हे पाहण्यासाठी विविध ठिकाणी 'ट्रॅप कॅमेरे' बसवण्यात आले आहेत.
advertisement
6/7
रात्रीच्या अंधारात मादी आपल्या बछड्याच्या शोधात येईल, असा विश्वास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिराळा परिसरात याआधीही अनेकदा उसाच्या फडात बिबट्याचे बछडे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
advertisement
7/7
ऊसतोडीचा हंगाम असल्याने बिबट्या सुरक्षित निवाऱ्यासाठी उसाच्या शेतीचा वापर करतात. "परिसरात बिबट्याचा वावर असला तरी ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. शेतात जाताना समूहाने जावे आणि बिबट्या किंवा बछडा दिसल्यास स्वतःहून काहीही न करता तातडीने वन विभागाला कळवावे," असे आवाहन वन विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sangali: दिसायला क्यूट पण पाहून सांगलीकरांची हवा टाइट, त्याला बघताच उसाच्या फडात खळबळ उडाली, PHOTO