TRENDING:

उन्हाळ्यात बनवा वर्षभर टिकणारे तांदळाचे सालपापड, सोपी रेसिपी माहितीये का?

Last Updated:
सालपापड बनवण्यासाठी सुरुवातीला तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे लागतात. यासाठी जाडा किंवा रेशनचे तांदूळ देखील वापरू शकतो.
advertisement
1/7
उन्हाळ्यात बनवा वर्षभर टिकणारे तांदळाचे सालपापड, सोपी रेसिपी माहितीये का?
उन्हाळ्यात वर्षभर लागणारी पापड, लोणची बनवून ठेवली जातात. बऱ्याच गृहिणी हे घटक घरी बनवून विकण्याचा घरगुती व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांचा वेळही जात असतो आणि घराला हातभार देखील लागत असतो. अशाच प्रकारे कोल्हापुरातील एक महिला विविध प्रकारचे पापड बनवून विकण्याचा व्यवसाय गेली कित्येक वर्षे करत आहे. त्यांच्या हातच्या पापडाला चव असल्याने कित्येक ग्राहक वर्षानुवर्षे त्यांच्याकडे पापड खरेदी करतात.
advertisement
2/7
कोल्हापूरच्या अनिता घोरपडे या विक्रमनगर या ठिकाणी राहतात. घरी त्यांचे पती, मुलगा, सून असे सदस्य मिळून राहतात. तर गेली 22 वर्षांपासून अनिता या पापड व्यवसाय करत आहेत. त्यामुळेच चविष्ट अशा सर्व पापडांची पाककृती अगदी त्यांच्या हातात बसली आहे. त्यापैकीच सालपापड कसे बनवले जातात याची त्यांनी माहिती दिली आहे. खरंतर तांदळाचे पापड असेच याला म्हणतात. तांदळाच्या पिठापासून हे पापड बनवले जातात, असे अनिता यांनी सांगितले.
advertisement
3/7
साल पापड बनवण्यासाठी सुरुवातीला तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे लागतात. यासाठी जाडा किंवा रेशनचे तांदूळ देखील वापरू शकतो. जाडा तांदूळ 7 दिवस तर रेशनचा तांदूळ 5 दिवस भिजत घालावा लागतो. रोजच्या रोज हे तांदूळ दुसऱ्या पाण्याने धुवून स्वच्छ करून नवीन पाण्यात भिजत ठेवावे लागतात.
advertisement
4/7
भिजवलेले तांदूळ शेवटच्या दिवशी पुन्हा 2 वेळा धुवून तिसऱ्या वेळी पाण्यातून काढून वाळवून घ्यावे लागतात. त्यानंतर त्या तांदळाचे पीठ केले जाते. सालपापड बनवताना एक छोटे भांडे पीठ घेतले असल्यास त्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडे जिरे, तीळ घातले जाते. यामध्ये एक तांब्या पाणी लागेल तसे मिसळून पीठ एकत्र करून घ्यावे. तयार झालेले पीठ हे एका तातलीवर सम प्रमाणात पसरेल इतके पातळ करुन घ्यावे.
advertisement
5/7
या पिठाचे सालपापड करण्यासाठी गॅसवर भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे. एका छोट्या ताटली पीठ सगळीकडे पसरवून घेऊन ती ताटली उकळणाऱ्या पाण्याच्या भांड्यावर ठेवावी. ताटातील पापडाचे पाण्याचे प्रमाण कमी झाले की ती ताटली उलटी करून ठेवावी.
advertisement
6/7
2 मिनिट हे पापड उकडून घेऊन सुईच्या साहाय्याने ताटलीमधील पापड काढून उन्हात वाळवण्यासाठी काही वेळ ठेवावेत. तर नंतर सावलीमध्ये हे पापड सुकवावेत.
advertisement
7/7
दरम्यान, ताटलीमध्ये पीठ घेताना एक चमचा पीठ घ्यावे. जास्त पीठ घेतल्यास पापड जाड होतात. तर कमी पीठ घेतल्यास पापड काढताना तुटतात. तसेच पिठात आपण खाण्याचा रंग वापरून रंगीत सालपापड देखील बनवू शकतो असेही अनिता यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात बनवा वर्षभर टिकणारे तांदळाचे सालपापड, सोपी रेसिपी माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल