TRENDING:

लाल तिखट आणि तांदळाचे पीठ; 31 डिसेंबरसाठी घरीच बनवा ‘या’ पद्धतीनं सुरमई रवा फ्राय

Last Updated:
कोल्हापूरच्या एका हॉटेलच्या शेफने घरीच हॉटेल स्टाईल रवा फ्राय ही डिश कशी बनवता येईल, याबाबत सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या 31 डिसेंबरला आपण घरच्या घरीच चविष्ट माशांचा आस्वाद घेऊ शकतो.
advertisement
1/6
लाल तिखट आणि तांदळाचे पीठ; घरीच बनवा ‘या’ पद्धतीनं सुरमई रवा फ्राय
नॉनव्हेज खायचे असेल तर कित्येकांना हॉटेलच्या चवीशिवाय इतर कोणती चव आवडत नाही. त्यात मासे खाण्यासाठी तर <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरकरांना</a> कोकणी किंवा स्पेशल सी फूड हॉटेल्स कडे आपला मोर्चा वळवावा लागतो.
advertisement
2/6
कोल्हापूरच्या राही डाईन इन् या हॉटेलच्या शेफने घरीच हॉटेल स्टाईल रवा फ्राय ही डिश कशी बनवता येईल, याबाबत सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या 31 डिसेंबरला आपण घरच्या घरीच चविष्ट माशांचा आस्वाद घेऊ शकतो.
advertisement
3/6
खरंतर रवा फ्राय बनवण्यासाठी आपण सुरमई किंवा पापलेट मासा वापरू शकतो. मासा बाजारातून आणल्यानंतर माशाचे काप लसूण, हळद, मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करुन ठेवावेत.
advertisement
4/6
सुरुवातीला एका प्लेटमध्ये आले-लसूण पेस्ट घ्यावी. त्यामध्ये लाल तिखट टाकावे. त्यावर 2-3 चमचे कोकम आगळ आणि चवीनुसार मीठ टाकून ठेवावे. 1 ते 2 चमचे तांदळाचे पीठ हे बनवलेल्या मसाल्यामध्ये मिसळून ते मिश्रण छान एकत्र करून घ्यावे.
advertisement
5/6
दुसरीकडे माशांच्या कापांना लावण्यासाठी रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून ठेवावे. त्यानंतर माशाचे काप प्रथम तयार केलेल्या मसाल्यामध्ये आणि नंतर रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून बाजूला ठेवावेत.
advertisement
6/6
हे माशाचे काप तळताना आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय देखील करू शकतो. शेवटी मासा थोडा तपकिरी रंगात तळून झाल्यानंतर मासा बाहेर काढावा आणि लिंबू आणि कांद्यासोबत खायला घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
लाल तिखट आणि तांदळाचे पीठ; 31 डिसेंबरसाठी घरीच बनवा ‘या’ पद्धतीनं सुरमई रवा फ्राय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल