TRENDING:

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला तिळाचे लाडू विकत कशाला घेता, एकदा घरी करून तर पाहा, फक्त 5 साहित्यांमध्ये तयार!

Last Updated:
Makar Sankranti 2025 Recipe: महाराष्ट्रात, भारतामध्ये अनेक प्रसिद्ध सण साजरे केले जातात. यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. या सणासाठी काळया रंगा सोबतच तीळ गुळाला देखील तितकंच महत्व आहे.
advertisement
1/6
मकर संक्रांतीला तिळाचे लाडू विकत कशाला घेता, एकदा घरी करून तर पाहा
महाराष्ट्रात, भारतामध्ये अनेक प्रसिद्ध सण साजरे केले जातात. यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. या सणासाठी काळया रंगा सोबतच तीळ गुळाला देखील तितकंच महत्व आहे.
advertisement
2/6
या तीळ गुळाच्या माध्यमातून आपण गोडवा हा वाटच असतो. त्यामुळे मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू कशा पद्धतीने घरीच तयार करायचे याची रेसिपी पुण्यातील गृहिणी राणी शिंदे यांनी सांगितली आहे.
advertisement
3/6
तिळाचे लाडू साहित्य : कोणताही पदार्थ करायचा तर त्यासाठी साहित्य आलंच. तिळाचे लाडू करण्यासाठी घरातील साहित्य वापरू शकता. त्यासाठी 1 वाटी तीळ , 1 वाटी गूळ, साजूक तूप, विलायची पूड आणि शेंगदाण्याचा कुट हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
4/6
सर्व प्रथम तीळ हे मंद आचेवर लालसर होई पर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर पाक तयार करून घ्यायचा. पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी पाण्यात टाकून बघायचा. त्याची गोळी तयार झाली की तो पाक व्यवस्थित तयार झाला आहे.
advertisement
5/6
पाकामध्ये तीळ टाकून घ्यायचे. त्यानंतर शेंदण्याचा कूट टाकायचा आणि चवी पुरती विलायची पूड टाकायची. हे सगळं मिश्रण छान एकत्रित परतून घ्यायचे. गरम आहे तो पर्यंत त्याचे छान असे लाडू वळून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू करू शकता, असं राणी शिंदे सांगतात.
advertisement
6/6
तिळाचे लाडू आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत आणि मकर संक्रांती या सणा दिवशी तीळ गुळाला देखील अत्यंत महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण हे लाडू बनवत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला तिळाचे लाडू विकत कशाला घेता, एकदा घरी करून तर पाहा, फक्त 5 साहित्यांमध्ये तयार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल