TRENDING:

T20 World Cup : टीम इंडिया सुपर-8 मध्ये, पाकिस्तानचं पॅक अप? एका जागेसाठी तिघांमध्ये फाईट!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे, त्यामुळे सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी टीममध्ये चढाओढ सुरू झाली आहे. काही टीमनी सुपर-8 मध्ये आधीच प्रवेश केला आहे.
advertisement
1/6
टीम इंडिया सुपर-8 मध्ये, पाकिस्तानचं पॅक अप? एका जागेसाठी तिघांमध्ये फाईट!
रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानवर 61 रननी दणदणीत विजय मिळवला, याचसोबत भारतीय टीम ग्रुप ए मधून सुपर-8 मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानसमोर मात्र नवीन संकट ओढावलं आहे.
advertisement
2/6
भारताविरुद्ध एवढा मोठा पराभव झाल्यामुळे पाकिस्तानच्या नेट रनरेटलाही हादरा बसला आहे. ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. पाकिस्तानचे 3 सामन्यांमध्ये 2 विजय आणि एक पराभवासह 4 पॉईंट्स आहेत, पण त्यांचा नेट रन रेट हा मायनस 0.403 आहे.
advertisement
3/6
दुसरीकडे ग्रुप ए मध्ये युएसएची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रुप स्टेजमध्ये युएसएचे सर्व 4 सामने झाले आहेत, यात त्यांनी 2 विजय मिळवले असून 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. युएसएचा नेट रनरेट हा +0.787 आहे, म्हणजेच पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.
advertisement
4/6
पाकिस्तानला सुपर-8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना आता 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल.
advertisement
5/6
नामिबियाने पाकिस्तानला पराभूत केलं तर युएसएची सुपर-8 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता सर्वाधिक आहे, कारण त्यांचा नेट रनरेट हा प्लसमध्ये आहे. दुसरीकडे नेदरलँडलाही सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाभठी आणखी एक संधी मिळेल.
advertisement
6/6
भारत आणि नेदरलँड यांच्यात 19 फेब्रुवारीला सामना होणार आहे, या सामन्यात नेदरलँडने भारताचा मोठ्या फरकाने पराभव केला, तर त्यांना सुपर-8 मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. नेदरलँडचा नेट रनरेट हा -1.352 एवढा आहे, त्यामुळे सध्या तरी त्यांचं टीम इंडियाला हरवणं तेही मोठ्या फरकाने सध्या तरी अशक्य वाटत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडिया सुपर-8 मध्ये, पाकिस्तानचं पॅक अप? एका जागेसाठी तिघांमध्ये फाईट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल