T20 World Cup : होता होता राहिला आणखी एक उलटफेर, सुपर-8 मध्ये चौथी टीम क्वालिफाय!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपची ग्रुप स्टेज आता शेवटाकडे येऊन पोहोचत आहे, त्यामुळे सुपर-8 मध्ये टीम क्वालिफाय व्हायला सुरूवात झाली आहे.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये बरेच उलटफेर होता होता राहिले. पण झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा आणि इटलीने नेपाळचा पराभव करून धक्के दिले, तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डबल सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला.
advertisement
2/7
सोमवारच्या टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यामध्ये मोठा उलटफेर होता होता राहिला. नेपाळविरुद्ध विजय मिळवलेली इटली यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आणखी एका विजयाजवळ पोहोचली होती.
advertisement
3/7
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 202 रन केले. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या विल जॅक्सने 22 बॉलमध्ये 53 रनची वादळी खेळी केली, त्यामुळे इंग्लंडला 200 रनचा टप्पा ओलांडता आला.
advertisement
4/7
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ इटली हा सामना जिंकेल, असं वाटत होतं. ओपनर जस्टिन मोस्काने 34 बॉल 43, बेन मेनेंटीने 25 बॉल 60 आणि ग्रॅन्ट स्टीवर्टने 23 बॉल 45 रनची खेळी केली, पण तरीही इटलीला विजय मिळवता आला नाही.
advertisement
5/7
इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन, सॅम करन यांनी 3-3 विकेट घेतल्या तर जोफ्रा आर्चरने 2, विल जॅक्स आणि आदिल रशीद यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं, त्यामुळे इंग्लंडचा 24 रननी निसटता विजय झाला.
advertisement
6/7
इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन, सॅम करन यांनी 3-3 विकेट घेतल्या तर जोफ्रा आर्चरने 2, विल जॅक्स आणि आदिल रशीद यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं, त्यामुळे इंग्लंडचा 24 रननी निसटता विजय झाला.
advertisement
7/7
इटलीविरुद्धच्या या विजयासह इंग्लंड सुपर-8 मध्ये प्रवेश करणारी चौथी टीम ठरली आहे. याआधी भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये प्रवेश झाला आहे. तर नामिबिया, ओमान, स्कॉटलंड, इटली, नेपाळ यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : होता होता राहिला आणखी एक उलटफेर, सुपर-8 मध्ये चौथी टीम क्वालिफाय!