कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय प्रसाद आणि दीपिकाचे सर्व प्रमुख सोशल मीडिया अकाउंट्स सस्पेंड करण्यात आले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्युब यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरील लाखो फॉलोअर्स असलेली त्यांची व्हेरिफाईड चॅनेल्स अचानक बंद झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अन्यायकारक कारवाई? प्रसादने मांडली व्यथा
नेमकी ही चॅनेल्स का बंद झाली? याचं उत्तर खुद्द प्रसाद आणि दीपिकाकडेही नाहीये. या धक्क्यातून सावरत प्रसादने एका नवीन व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. अत्यंत भावूक होत तो म्हणाला, "आम्ही गेल्या १० वर्षांपासून प्रामाणिकपणे कंटेंट बनवत आहोत. आजवर कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं नाही. सर्व नियमांचं पालन करूनही आमची सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आली आहेत. हे का घडलं, याचं कारण आम्हाला अद्याप दिलेलं नाही."
advertisement
करोडोंचा व्यवहार आणि ब्रँड्सचं टेन्शन
प्रसाद आणि दीपिका हे केवळ चाहत्यांचं मनोरंजन करत नसून, ते अनेक मोठ्या ब्रँड्सचे चेहरे आहेत. अकाउंट्स बंद झाल्यामुळे त्यांचे अनेक व्यावसायिक प्रोजेक्ट्स मधूनच रखडले आहेत. प्रसादने सांगितलं की, "अनेक क्लायंट्स आणि ब्रँड्स आमची वाट पाहत आहेत. आमचे प्रलंबित प्रोजेक्ट्स थांबले आहेत आणि अकाउंट्सचा एक्सेस नसल्यामुळे आम्ही ते पूर्ण करू शकत नाही आहोत." एका इन्फ्लुएंसरसाठी त्याची सोशल मीडिया अकाउंट्स हीच त्यांची संपत्ती असते, आणि तीच एका रात्रीत हिरावून घेतल्यामुळे या कपलला मोठा आर्थिक फटकाही बसला आहे.
चाहत्यांची फौज पाठीशी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून अद्याप यावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेलं नाही. मात्र, प्रसाद आणि दीपिकाने आपलं डिजिटल अस्तित्व परत मिळवण्यासाठी कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे. या संकटाच्या काळात त्यांचे हजारो चाहते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेक कमेंट्स करून चाहते त्यांना धीर देत आहेत.
