TRENDING:

उन्हाळ्यात बर्फ टाकून प्या चहा, फक्त 2 मिनिटांत तयार होते आईस टी

Last Updated:
उन्हाळ्यात बऱ्याचदा गरम चहा पिणे नको वाटते. तेव्हा बर्फ टाकून थंडावा देणारा आईस टी हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
1/7
उन्हाळ्यात बर्फ टाकून प्या चहा, फक्त 2 मिनिटांत तयार होते आईस टी
भारतातील बहुतांश लोक चहा प्रेमी आहेत. ऋतू कोणताही असो, त्यांना चहा लागतोच. पण बऱ्याचदा उन्हाळ्यात गरम चहा पिणे नको वाटते. तेव्हा बर्फ टाकून थंडावा देणारा आईस टी हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
2/7
अगदी मोजक्या साहित्यात घरच्या घरी आपण कॅफे स्टाईल आईस टी बनवू शकतो. <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> येथी मेघना देशपांडे यांनी आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/7
चहा पावडर ( तुम्ही घरात जी चहा पावडर वापरता ती वापरली तरी चालेल), ऑरेंज सरबत प्रिमिक्स किंवा या ऐवजी तुम्ही ग्लुकॉन डी किंवा ग्लुकॉन सी चा वापर देखील करू शकता. तसेच चहा पावडर ऐवजी बाजारात ज्या टी बॅग भेटतात त्याही तुम्ही वापरू शकता.
advertisement
4/7
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 200 मिली कडक उकळतं पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये पाव चमचा चहा पत्ती टाकायची आणि ते पाणी तसंच पाच ते दहा मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवायचं.
advertisement
5/7
दहा मिनिटानंतर चहा पत्ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. त्यानंतर ते चहा पत्ती टाकलेले पाणी एका कपामध्ये गाळून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे ऑरेंज सरबत प्रिमिक्स टाकायचं. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं.
advertisement
6/7
आपण यामध्ये साखर टाकली नाही. कारण या प्रिमिक्समध्ये आधीच साखर असते. त्यानंतर तुम्हाला हवा तेवढ्या प्रमाणात बर्फ टाकावा. अशा सोप्या पद्धतीने हा आईस टी तयार होतो.
advertisement
7/7
उन्हाळ्यात ही सोपी रेसिपी घरीच बनवून आईस टी पिण्याचा आनंद घेऊ शकता, असे मेघना देशपांडे सांगतात. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात बर्फ टाकून प्या चहा, फक्त 2 मिनिटांत तयार होते आईस टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल