Red vs Green Chilly : लाल की हिरवी कोणती मिरची असते आरोग्याला जास्त फायदेशीर?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
मिरची कोणत्याही चटपटीत पदार्थांसाठी आवश्यक असते. भारतीय, चायनीज आणि मेक्सिकन कोणत्याही प्रकारचे पदार्थ मिरचीशिवाय पूर्ण होत नाही. भारतीय स्वयंपाकात मिरची अतिशय आवश्यक असते. मिरची आपल्यासाठी फायदेशीर देखील असते. पण लाल की हिरवी, यामध्ये बऱ्याच लोकांना संभ्रम असतो. चला पाहूया त्याचे उत्तर..
advertisement
1/8

काही लोकांना स्वयंपाकात लाल मिरची किंवा तिखट घालायला आवडते तर काहींना हिरवी मिरची आवडते. पण या दोन्ही मिर्च्यांपैकी आपल्या आरोग्यासाठी नेमकी कोणती फायदेशीर असते. हे आपण आज जाणून घेऊया.
advertisement
2/8
हेल्थलाइनच्या मते, या दोन्ही लँकाइ सिमला मिरची आणि टोमॅटो वनस्पती कुटुंबातून येतात. एक चमचा लाल मिरचीमध्ये 88 टक्के पाणी, 0.3 ग्रॅम प्रथिने, 1.3 ग्रॅम साखर, 0.8 ग्रॅम साखर, 0.2 ग्रॅम फायबर आणि 0.1 ग्रॅम चरबी असते.
advertisement
3/8
याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के1, पोटॅशियम, कॉपर आणि व्हिटॅमिन ए असते, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
advertisement
4/8
दुसरीकडे, एक कप हिरव्या मिरचीमध्ये 52.76% व्हिटॅमिन सी, 36.80% सोडियम, 23.13% लोह, 18.29% व्हिटॅमिन B9, 12.85% व्हिटॅमिन B6 असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, पी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर देखील असते.
advertisement
5/8
जर आपण लाल मिरचीची हिरव्या मिरचीशी तुलना केली तर हिरवी मिरची आरोग्यासाठी चांगली असते. हिरव्या मिरचीमध्ये भरपूर पाणी असते आणि कॅलरीज कमी असतात. हिरव्या मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि एंडोर्फिन भरपूर प्रमाणात असतात.
advertisement
6/8
याउलट लाल मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे पेप्टिक अल्सर होऊ शकतो. एवढेच नाही तर बाजारातून लाल मिरची पावडर विकत घेतल्यानंतर त्यामध्ये आरोग्यासाठी हानिकारक रंग आणि कृत्रिम रंग असण्याची शक्यता असते.
advertisement
7/8
हिरव्या मिरचीचे अनेक फायदे आहेत. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रित करते. याशिवाय, पचन सुधारते आणि त्वचा निरोगी ठेवते. हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन असल्यामुळे हृदय निरोगी राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर हिरची मिरची चयापचय वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करते..
advertisement
8/8
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Red vs Green Chilly : लाल की हिरवी कोणती मिरची असते आरोग्याला जास्त फायदेशीर?