Rice in Weight loss : भात खाऊनही वजन कमी करता येतं, फक्त 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
डायटिशियन सारिका पाटिल यांनी भात खाऊनही वजन कमी कसं करता येतं याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
1/7

आपल्याकडे असा एक समज आहे की वेटलॉस डाएट म्हटलं की भात पूर्णपणे बंद करावा लागतो. पण खरं सांगायचं झालं तर, भात हा आपल्या दैनंदिन जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना तर भाताशिवाय जेवण अपुरं वाटतं. मग प्रश्न पडतो की भात खाल्ला तर वजन कमी होणार नाही का?
advertisement
2/7

तर याचं उत्तर आहे हो, डायटिशियन सारिका पाटिल यांनी भात खाऊनही वजन कमी कसं करता येतं याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
3/7
1. भाताचं प्रमाण नियंत्रित ठेवाभात खाणं थांबवण्यापेक्षा त्याचं पोर्शन कंट्रोल करणं जास्त महत्त्वाचं आहे. एक मीडियम साईजचा बाऊल भात हे वजन कमी करण्यासाठी पुरेसं प्रमाण आहे. अतिरेक केल्यानेच जास्त कॅलरी शरीरात जातात.
advertisement
4/7
2. भात शिजवण्याची पद्धत बदलाभात अधिक हलका आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी शिजवण्याची पद्धत महत्त्वाची आहे. भात शिजवण्यापूर्वी अर्धा ते एक तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाण्यासोबत भात शिजवा आणि वर आलेला स्टार्चचा थर काढून टाका. यामुळे भातातील जादा स्टार्च कमी होतो.
advertisement
5/7
3. भातासोबत योग्य कॉम्बिनेशन ठेवाभातामध्ये आधीच कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे त्याच्यासोबत पुन्हा चपाती किंवा भाकरी घेऊ नका. त्याऐवजी भातासोबत डाळी, उसळी, आणि फायबरयुक्त भाज्या घ्या. यामुळे पोट भरतं आणि पोषणमूल्यही वाढतं.
advertisement
6/7
भात हा वजन वाढवणारा नाही, तर त्याचं प्रमाण, पद्धत आणि कॉम्बिनेशन योग्य ठेवलं तर वेटलॉस डाएटमध्ये भात सहज खाऊ शकता.
advertisement
7/7
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rice in Weight loss : भात खाऊनही वजन कमी करता येतं, फक्त 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा