Yoga Day 2024 : योग करण्यापूर्वी पाणी प्यावं की नाही? 99 टक्के लोकं करतात ही चूक
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
21 जून हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. नियमित योग केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन ठीक होते आणि मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. याशिवाय योग करण्याचे अनेक फायदे आहेत. काही लोक रिकाम्यापोटी योग करतात तर काहीजण योगासन करण्यापूर्वी किंवा केल्यावर लगेचच पाणी पितात. मात्र हे शरीरासाठी किती फायदेशीर किंवा नुकसानदायक आहे हे माहित करून घेऊयात.
advertisement
1/6

योग करण्यापूर्वी पाणी पिऊ शकतो? : तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार योग करण्याच्या कमीतकमी 30 मिनिटांपूर्वी पाणी प्यायला हवं. यामुळे बॉडीचं टेम्प्रेचर बॅलेन्स राहत आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं राहण्यास मदत होते. जर योग करण्याच्या काही वेळापूर्वीच तुम्ही पाणी प्यायले तर मेटाबोलिज्ममध्ये समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे योग करताना तुम्ही एकाग्र राहत नाही. त्यामुळे नेहमी योग करण्याच्या अर्धातास पूर्वीच पाणी प्यावे.
advertisement
2/6
योग केल्यावर केव्हा पाणी प्यावे? : योग केल्यावर जवळपास 30 ते 40 मिनिटांनी पाणी पिणे योग्य ठरते. योग केल्यावर लगेचच पाणी प्यायल्याने पोटात समस्या निर्माण होऊन पोटदुखीची समस्या निर्माण होते. तसेच मळमळल्यासारखे सुद्धा वाटू शकते. म्हणून योग केल्यावर पाणी पिण्यासाठी तेवढा वेळ घ्यावा ज्यामुळे आपल्या शरीराचं तापमान बॅलेन्स राहील.
advertisement
3/6
योग करताना पाणी प्यावं का? : योगासन करत असताना त्यादरम्यान कधीही पाणी पिण्याची चूक करू नका. असं केल्याने आरोग्याशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. याचमुळे ब्लोटिंगची समस्या होऊ शकते आणि बॉडी टेम्प्रेचर असंतुलित होऊ शकते. जर खूप जास्त तहान लागत असेल तर थोडं पाणी पिऊ शकता. मात्र योग्य करताना शक्यतो पाणी पिणे टाळा.
advertisement
4/6
योग करताना अन्नाचं सेवन करावं का ? : अनेक लोकं योग करताना काहीही खात पित नाहीत, कारण यामुळे आसन करत असताना अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून म्हंटल जात की योग करण्याच्या कमीतकमी दोन ते तीन तासांपूर्वी तुम्ही अन्नाचं सेवन करू शकता. कारण पोटात अन्न पचण्यासाठी शरीराला थोडा वेळ लागतो.
advertisement
5/6
योग करण्यापूर्वी काय खावं : जे लोक सकाळी नियमित योगाभ्यास करतात ते योग करण्याच्या 45 मिनिटांपूर्वी केळ किंवा जांभूळ सारखी फळे खाऊ शकतात. योग करण्याच्या 45 मिनिटं अगोदर हे पदार्थ खाल्ल्याने योगासन करताना एनर्जी मिळते.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Yoga Day 2024 : योग करण्यापूर्वी पाणी प्यावं की नाही? 99 टक्के लोकं करतात ही चूक