Hair Colour : केसांना कलर केल्यावर शॅम्पू लावायचा की नाही? 99 % लोक करतात ही चूक, अशी आहे योग्य पद्धत
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या केसांना कलर करणे ही एक फॅशन झाली आहे. पूर्वी केवळ डोक्यावर पांढरी केस असलेले लोक केसांना कलर किंवा डाय करायचे, परंतु आता तरुण सर्रास हेअर कलर करतात. केसांना कलर केल्याने केसं सुंदर आकर्षक दिसतात. तुम्ही देखील केसांना कलर करण्याचा विचार करत असाल तर याच्याशी निगडित माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
advertisement
1/7

काहीजण वेळ वाचवण्यासाठी केसांना घरीच कलर करतात. तर काहीजण केसांना कलर करण्यासाठी सलूनमध्ये जातात. परंतु काहीवेळा केसांना कलर करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे केसांचा रंग हा काही दिवसात फिका पडू लागतो. तेव्हा केसांचा रंग लॉन्ग लास्टिंग राहावा यासाठी काही टिप्स फॉलो करा.
advertisement
2/7
अनेक लोक केसांना कलर केल्यावर काही वेळाने लगेच केस शॅम्पूने धुवून टाकतात. अशामुळे केसांमध्ये आढळणारे हेयर क्युटिकल कलरला लॉक करू शकत नाहीत. परिणामी केसांना केलेला रंग हा लवकर फेड होऊ लागतो.
advertisement
3/7
जर तुम्ही केसांना कलर केला असेल तर लक्षात घ्या 72 तास म्हणजेच 3 दिवस केसांना धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करू नका. यामुळे कलर केसांमध्ये व्यवस्थित लॉक होईल आणि जास्त दिवस केसांचा रंग टिकू शकेल.
advertisement
4/7
केसांना कलर केल्यावर हेअर वॉश करण्यासाठी सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करा. तसेच केसांना पाण्यात असलेल्या केमिकल आणि क्लोरीन पासून वाचवण्यासाठी केस धुण्याकरता फिल्टर वॉटरचा वापर करा.
advertisement
5/7
तुम्हाला केसांचा रंग जास्त काळ टिकवायचा असेल तर गरम पाण्याने केस धुवू नका. अशामुळे केसांचा रंग लवकर डल होतो.
advertisement
6/7
केसांना कलर केल्यावर शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना कंडीशनर नक्की लावा. यामुळे केसांचा रंग आणि मॉइश्चर लॉक होईल. सोबतच केसांचा रंग जास्त काळ टिकेल.
advertisement
7/7
केसांचा कलर दीर्घकाळ टिकावा असं वाटत असेल तर केसांवर हीटिंग टूल्स वापरू नका. हीटिंग टूल्स लावल्याने केसांचा रंग फेड होतो. तसेच उन्हात जाताना देखील केसं स्कार्फ किंवा कॅपचा वापर करून प्रोटेक्ट करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Colour : केसांना कलर केल्यावर शॅम्पू लावायचा की नाही? 99 % लोक करतात ही चूक, अशी आहे योग्य पद्धत